आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेजुरीचा पेशवेकालीन अपरिचित इतिहास उलगडणार, इतिहासतज्ञ राज मेमाणे यांचे संशोधन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जयश्री बोकील 

पुणे - राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ऐतिहासिक जेजुरीचा पेशवेकालीन इतिहास अस्सल कागदपत्रांच्या अभ्यासातून आता सर्वांसमोर येणार आहे. इतिहासाचे प्रसिद्ध अभ्यासक आणि मोडी लिपी तज्ञ राज मेमाणे यांनी तब्बल पाच हजार मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे परिशीलन करून जेजुरीचे पेशवेकालीन चित्र समोर आणले आहे. लवकरच मेमाणे यांचे हे संशोधन ग्रंथरूपातही वाचकांपर्यंत पोचणार आहे.संशोधनाविषयी माहिती देताना मेमाणे म्हणाले, ‘इतिहासाचा अभ्यासक या नात्याने जेजुरी हा प्रथमपासून माझ्या जिज्ञासेचा विषय आहे. मोडी लिपी सहजतेने वाचता येऊ लागल्यावर पुराभिलेख संग्रहालयातील पेशवे दप्तरातील जेजुरीविषयक कागदपत्रांनी माझे लक्ष वेधून घेतले. भौगोलिक स्थानापासून ते देवस्थानच्या रोजनिशीपर्यंतचा प्रत्येक तपशील पेशव्यांनी आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेने नेमका टिपून ठेवलेला मला आढळला आणि त्यातून जेजुरीचे पेशवेकालीन समग्र चित्र साकारत गेले. त्यामुळे हे सारे लोकांपर्यंत पोचवण्याची तळमळ जागी झाली आणि या संशोधनाचे ग्रंथरूप सिद्ध करावे, असे वाटले,’.काय गवसले मोडी लिपीतील कागदपत्रांत?

  • जेजुरी गडाचे दैनंदिन व्यवस्थापन कसे होते याची माहिती
  • जेजुरीचा खंडोबा हा पेशवाईतील सर्वात श्रीमंत देव, खंडोबाच्या व म्हाळसाईच्या सोने, चांदी, रत्नजडित दागिन्यांची यादी
  • जेजुरी देवस्थानकडे असणारे हत्ती, त्यांचा दैनंदिन खर्च, औषधोपचाराच्या नोंदी, त्या हत्तींची समाधी
  • जेजुरीतील ऐतिहासिक पेशवे तलाव पहिल्या बाजीरावांनी बांधल्याचा पुरावा यामध्ये मिळाला आहे.
  • जेजुरीविषयक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तपशील
  • जेजुरीचे पारंपरिक वतनदार कोण होते याची माहिती
  • होळकर घराण्याचा आणि जेजुरीचा संबंध आणि योगदान

सर्व तपशील ग्रंथात समाविष्ट केले


जेजुरीत सध्या विविध यात्रा भरतात. त्यासाठी लक्षावधी भाविक येतात. खरेतर वर्षभर या ना त्या निमित्ताने जेजुरी गजबजलेली असते. पण, पेशवेकाळात कोणत्या यात्रा जेजुरीत होत असत, त्यांचे स्वरूप काय असे, याचीही माहिती कागदपत्रांतून सापडली आहे. त्याचाही तपशील ग्रंथात समाविष्ट असेल.  एकूणच हा अनुभव वेगळा असाच होता.-  योगेंद्र ऊर्फ राज मेमाणे,  इतिहास संशोधक आणि मोडी लिपी तज्ञ
 

बातम्या आणखी आहेत...