आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपदाचा मान 18 वर्षांनी महिलेला मिळाल्याचा अानंद: डाॅ. अरुणा ढेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळेल हे अपेक्षित नव्हते. पण  निवडणुकीशिवाय सन्मानाने मिळालेल्या या पदामुळे मला अतिशय अानंद झाला अाहे. महाराष्ट्राची साहित्य, कला संस्कृतीची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर साेपवण्यात अाली असून ती मी व्यवस्थितरीत्या पार पाडेन,’ अशा भावना ९२ व्या साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा व ज्येष्ठ कवयित्री डाॅ. अरुणा ढेरे यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केल्या.   
रवींद्र नाट्यमंदिरातील पु.ल. अकादमी सभागृहात शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्या पत्नी विजया यांच्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमासाठी डाॅ. ढेरे अाल्या हाेत्या.

 

अध्यक्षपदी निवड झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘संमेलनाच्या अध्यक्षपदी १८ वर्षांनंतर एका महिलेला संधी मिळाली अाहे, त्याबद्दल मी सर्वांची अाभारी अाहे.  मला या पदाबाबत अादर अाहे. माझ्याकडून ज्या अपेक्षा अाहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी सर्वस्व पणाला लाविन. साहित्याच्या व्यासपीठावर दिशा देणारी व्यक्ती असावी. मग ती महिला असेल किंवा पुरुष’, असेही डाॅ. ढेेरे या वेळी म्हणाल्या.


‘अाज मी खासगी कार्यक्रमाला अाले अाहे, त्यामुळे फार काही बाेलणार नाही. मात्र साहित्य महामंडळ पुण्यात पत्रकार परिषद घेईल, त्याच वेळी मी अधिकृतरीत्या बाेलेन. असे डाॅ. ढेरे म्हणाल्या.  ‘साहित्य अाणि दर्जा यावर निकष करायचा झाल्यास स्त्री साहित्य अाज कुठेही कमी नाही. स्त्रिया चांगले लिखाण करीत असून  युवा लेखिकांचे लेखनदेखील चांगले अाहे, असेही त्या म्हणाल्या. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी पुन्हा सर्वांचे अाभार मानले. दरम्यान, शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्या हस्ते डाॅ. ढेरे यांचे अभिनंदन करण्यात अाले.   

 

साहित्यसंपदा  
कवितासंग्रह   : प्रारंभ (१९८७), यक्षरात्र (१९८७)   , मंत्राक्षरे (१९९०), निरंजन (१९९४), जावे जन्माकडे (१९९८), निळ्या पारदर्शक अंधारात (२००४).   
कथासंग्रह    
कृष्णकिनारा, अज्ञात झऱ्यावर रात्री, उंच वाढलेल्या गवताखाली, मन केले ग्वाही, पावसानंतरचे ऊन, प्रतिष्ठेचा प्रश्न - अनुवादित कथा,

   
कादंबरी   
मैत्रेयी, उर्वशी, महाद्वार   
ललित - सांस्कृतिक लेखसंग्रह  
 
लावण्ययात्रा, रूपोत्सव, भगव्या वाटा, काळोख आणि पाणी, कवितेच्या शोधात, मनातले आभाळ, नव्या जुन्याच्या काठावरती, अर्ध्या वाटेवर, वेगळी माती वेगळा वास, माणूस आणि माती, स्त्री आणि संस्कृती, कवितेच्या वाटेवर, अंधारातले दिवे, प्रेमातून प्रेमाकडे   
समीक्षा  : काळोखाचे कवडसे , 
लोकसाहित्यविषयक  : 
लोकसंस्कृतीची रंगरूपे, लोक आणि अभिजात, आठवणीतले अंगण   
सामाजिक  इतिहास - व्यक्ती आणि कार्य, विस्मृतिचित्रे, प्रकाशाचे गाणे, डॉ. विश्राम रामजी ढोले आणि त्यांचा परिवार, विवेक आणि विद्रोह, त्यांची झेप त्यांचे अवकाश, जाणिवा जाग्या होताना....

   
- संपादन : विवेकामृत (विवेकानंदांची पत्रे), अक्षरदिवाळी (चार मान्यवरांच्या सहयोगाने) चार खंड, नागमंडल (मराठी नागकथा), मराठी प्रेमकविता (शांता शेळके यांच्या सहयोगाने), बहिणाई - दिवाळी वार्षिक (कविता विशेषांक), बहिणाई (कथा विशेषांक), लोकसंस्कृतीचे प्रतिभा 
दर्शन, सेतुबंध ( वार्षिकाचे तीन अंक), उमदा लेखक उमदा माणूस (वि. स. वाळिंबे - व्यक्ती आणि वाङ;्मय), स्त्री साहित्याचा मागोवा - खंड १ व २ (सहयोगाने), सुगंध उरले, सुगंध उरले (ना. घ. देशपांडे यांची निवडक कविता), दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार आणि कार्य, फुलांची ओंजळ (मालतीताई किर्लोस्कर यांचे निवडक ललित लेख), स्त्री लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०), स्त्री लिखित मराठी कथा ( १९५० ते २०१०),    
विवेचक प्रस्तावना   
सुजनहो -पु, ल. देशपांडे, प्रिय जीए - सुनीता देशपांडे, बोरकरांची समग्र कविता - खंड १, समग्र इंदिरा संत

  
किशोर व कुमारांसाठी   
संस्कार कथामालेतील तीन पुस्तके, तीन चरित्रे - येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, संत ज्ञानेश्वर, एका राजाची गोष्ट (प्रौढ साक्षरांसाठी लोककथा), सुंदर जग हे (पर्यावरणविषयक कविता), मामाचं घर (कवितासंग्रह)

  
दूरचित्रवाणीसाठी लेखन   
“सांजसावल्या’ या दैनंदिन मालिकेसाठी पटकथा व संवादलेखन   


-पारितोषिके व पुरस्कार
कवी यशवंत पारितोषिक, कवी केशवसुत पारितोषिक, ह. श्री. शेणोलीकर पारितोषिक, ल. म. प्रभुणे पारितोषिक, महाराष्ट्र शासन, बालकवी पारितोषिक, श्याम पानगंटी पारितोषिक, वा. म. जोशी पारितोषिक, आनंदीबाई शिर्के, कवी कुसुमाग्रज, कवी ना. धों. महानोर, काकासाहेब गाडगीळ, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, महामहोपाध्याय द. वा. पोतदार पारितोषिक, इंदिरा संत, आदिशक्ती, पुणे मराठी ग्रंथालय, राष्ट्रीय पारितोषिक -एनसीईआरटी, दिल्ली, बालकुमार, चैत्रबन, आचार्य अत्रे,  हे. वि. इनामदार, पु. ल. देशपांडे, ना. ह. आपटे, अनंत लाभसेटवार पुरस्कार, मालती बेडेकर स्मृती शिष्यवृत्ती, गो. नी. दांडेकर, भा. रा. तांबे पुरस्कार,    


इतर : पुणे विद्यापीठ विधिसभेवर राज्यपालनियुक्त सदस्य, पुरस्कारांच्या निवड समितींवर, कवितांचे अनेक भाषांत अनुवाद, अनेक वाङ््मयीन कार्यक्रमांचे संहितालेखन व सादरीकरण, देशभर व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवादांत सहभाग, निबंधवाचन, शोधनिबंधलेखन, विविध विभागीय संमेलनांचे अध्यक्षपद.

बातम्या आणखी आहेत...