आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशविरुद्ध यजमान भारतीय संघाची विजयी माेहीम अाहे कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलामी सामन्याच्या पूर्वसंध्येला लाेकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे व शार्दूल साेबत जेवण करताना. - Divya Marathi
सलामी सामन्याच्या पूर्वसंध्येला लाेकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे व शार्दूल साेबत जेवण करताना.

नवी दिल्ली - भारत व बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी दिल्ली येथे खेळवला जाईल. वायू प्रदूषणामुळे अनेक तज्ज्ञांनी ठिकाण बदलण्याचे म्हटले होते, मात्र बीसीसीआयने ठिकाणात कोणताही बदल केला नाही. टीम इंडिया टी-२० मध्ये कधीच बांगलादेशकडून पराभूत झाली नाही. दोघांत आतापर्यंत ८ सामने खेळवण्यात आले. सर्व सामने भारताने जिंकले. दिल्लीमध्ये दुसऱ्या कोणता टी-२० सामना खेळवण्यात येत आहे. २०१७ मध्ये झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ५३ धावांनी हरवले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावा काढल्या होत्या. यंदा दिल्लीत टीम पुन्हा एकदा लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारत व बांगलादेश यांच्यात पहिल्यांदा टी-२० ची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येत आहे. 

देशात ३ वर्षांनी सामना, धोनीने धावबाद करत विजय मिळवून दिला होता : भारतीय संघ देशात दुसऱ्या बांगलादेशसोबत टी-२० सामना खेळेल. मार्च २०१६ मध्ये विश्वचषकाच्या एका रोमांचक सामन्यात टीमने बांगलादेशला एका धावाने हरवले.
 

कर्णधार रोहितला  माेठी संध
रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करतोय. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये विराट कोहलीच्या सर्वाधिक २४५० धावा आहेत. रोहित २४४३ धावांवर दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने ८ धावा केल्यावर तो नंबर वनवर पोहोचेल. महमूदुल्लाहला १४०० धावा पूर्ण करण्यासाठी २३ धावांची गरज आहे. 
 

दवामुळे नाणेफेक ठरेल महत्त्वाची 
सामन्यात नाणेफेक महत्त्वाची ठरेल. सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडणार असल्याने फिरकीपटूंना अधिक मदत मिळणार नाही. अशात नाणेफेक जिंकणारी टीम प्रथम फलंदाजी करेल. भारतीय संघातील मधल्या फळीत नव्या खेळाडूंना संधी मिळेल.