आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Hyderabad Man Who Rescued Over 107 People Who Try To Commit Suicide, Here's Why

भावाचा झाला नदीत बुडून मृत्यू, तर मोठ्या भावाने वाचवले 107 लोकांचे प्राण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद(तेलंगाणा)- येथील रहिवासी असणाऱ्या शिवाने लाइफगार्ड म्हणून आतापर्यंत 'टँक बँड' नदीवर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या 107 लोकांचा जीव वाचवला आहे. या कामासाठी तो आता नदीजवळच राहण्यासाठी आला आहे. त्याच्या या कामाचा हेतू काय असा प्रश्न विचारला असता, शिवाने सांगितले की, त्याच्या भावाचा नदीत बुडूण मृत्यू झाला होता. त्यामुळे कोणाचाही बुडूण मृत्यू होऊ नये म्हणून त्याने हा निर्णय घेतला.

 

माहितीनुसार, शिवाच्या 12 वर्षाच्या भावाचा हैदराबादच्या असमनपेट नदीतमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर स्वतः शिवाने आपल्या भावाचा मृतदेह बाहेर काढल्यामुळे त्याला खूप दुःख झाले. आपल्या भावाप्रमाणे कोणासोबत अशी घटना घडू नये, म्हणून त्याने लाइफगार्ड होण्याचा निर्णय घेतला. 

 

अनेकदा झाले आहे संक्रमण 
शिवाने सांगितले की, त्याने आतापर्यंत 107 लोकांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे पोलिस विभागाने त्याला होमगार्डची नोकरी देण्याचा आश्वासन दिले होते, पण आतापर्यंत काहीच झालेले नाही. शिवा या कामात कोणत्याही सुरक्षा उपकरणाचा उपयोग न करता तो लोकांना वाचवतो. जर शासनाने त्याला उपकरणांचा पुरवठा केला तर आणखी चांगले काम करता येईल. यादरम्यान एका महिलेला वाचवताना त्याच्या छातीत आणि खांद्यावर रॉड लागल्यामुळे अनेक वेळा इंफेक्शन झाले आहे.

 

शासनाने मदतीसाठी पुढाकार घ्यावाः पोलिस उपायुक्त
पोलिस उपायुक्त विश्व प्रसाद यांनी सांगितले की, शिवा नेहमीच नदीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणीच या कामात मदत करण्यासाठी येत नाही. त्यांनी नुकतेच तेलगंना सोशल वेलफेअर एज्यूकेशनल इंस्टीट्यूशन सोसायटीचे सचिव प्रवीण कुमार यांना एक पत्र लिहून शिवाच्या मुलांना शाळेत प्रवेश द्यावा अशी विनंती केली आहे. असे सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली. तसेच, हैदराबादच्या जिल्हाधिकाऱ्याकडेही शिवाची मदत करण्याचा प्रस्ताव पाठवणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...