आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Hyderabad Victim's Sister Said, 'If The Police Had Shown The Same Alert Earlier Then Priyanka Would Have Survived'

हैदराबाद पीडितेची बहीण म्हणाली, 'हीच सतर्कता पोलिसांनी तेव्हा दाखवली असती तर दिशा वाचली असती'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : व्हेटरनरी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि नंतर तिला जिवंत जाळल्याप्रकरणी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये शुक्रवारी चारही आरोपी मारले गेले. मानवाधिकार आयोगाने याची चौकशी सुरू केली आहे. पीडितेच्या वडिलांचा जबाब आयोगाने नोंदवला. शमशाबाद परिसरातील नक्षत्र कॉलनीच्या कम्युनिटी हॉलमध्ये पीडितेचे कुटुंब, त्यांचे आप्तेष्ट व रहिवासी रविवारी जमले होते. ज्या हॉलमध्ये दिशा व भाव्याचा वाढदिवस साजरा केला त्याच हॉलमध्ये तिला श्रद्धांजली वाहताना आई वडिलांसोबत सगळ्यांना हुंदके आवरत नव्हते. 'मदतीसाठी तिने फोन केला, पण आपण तिला वाचवू शकलो नाही' हेच तिची धाकटी बहीण सांगत होती. पोलिसांनी आरोपींना गोळ्या घातल्यानंतर जल्लोष होतोय. मात्र 'आता कशानेही बहीण परत येणार नाही, हीच सतर्कता पोलिसांनी तेव्हा दाखवली असती तर दिशा वाचली असती,' असे ती म्हणाली.

२७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चार नराधमानी केलेल्या अमानुषतेने दु:खाचा डोंगर कोसळला. तिच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशी कुटुंब थोडे सावरले आहे. 'एन्काउंटरबद्दल आम्हाला सांगता येणार नाही, मात्र आता आमची बहीण परत येणार नाही,' पीडितेची बहीण सांगत होती. दुर्घटनेपूर्वी दिशा सात मिनिटे तिच्याशी फोनवर बोलत होती. तिचा फोन डिस्कनेक्ट झाल्यावर आम्ही लगेच पोलिसांना कळवले. तेव्हा तातडीने मदत मिळाली असती तर तिचा जीवतरी वाचला असता असे तिला वाटते. दीड-दोन महिन्यांत निकाल लागला असता, पण आमच्यासाठी तो न्याय नाही. पुरुष महिलांचा आदर करतील, अशा घटना थांबतील तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया भाव्याने दिली.

मंत्री म्हणतात.. एन्काउंटरचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे

पीडितेवर अत्याचार करणाऱ्या चारही अाराेपींच्या एन्काउंटरचे श्रेय मुख्यमंत्र्यांना जाते, असे वादग्रस्त वक्तव्य तेलंगणाचे पशुविकासमंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांनी केले. वरिष्ठ पातळीवरून संमती असल्याशिवाय एवढी माेठी अॅक्शन शक्य नसते. या घटनेमुळे तेलंगणा हे 'हे तत्पर कृती' करणारे राज्य असल्याची प्रतिमा देशात निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ अानंदी अाहे,' असे यादव म्हणाले.

उन्नाव बलात्कार : कडेकोट बंदोबस्तात पीडितेचे दफन, आरोपींना फाशी द्या : स्थानिक लोकांची उग्र निदर्शने


उन्नाव : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये बलात्कार पीडितेच्या मृतदेहाचे कडेकोट बंदोबस्तात रविवारी दफन करण्यात आले. सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि कमलराणी वरुण उपस्थित होते. दरम्यान, सकाळपासून लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करून आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. तत्पूर्वी पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाला तिच्या कुटुंबीयांची खूप मनधरणी करावी लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले आणि कुटुंबातील एका सदस्यास नोकरी दिली तरच अंत्यसंस्कार होतील, अशी अट कुटुंबीयांनी घातली. यानंतर लखनऊचे आयुक्त मुकेश मेश्राम आणि आयजी एस. के. भगत यांनी पीडितेच्या वडिलांशी चर्चा केली. कुटुंबासाठी एक घर आणि पीडितेच्या बहिणीला नोकरी देण्याची हमी दिल्यावर पीडितेचे पार्थिव दफन करण्यात आले. ५ डिसेंबरला एका बलात्कारपीडितेला बलात्कारातील आरोपींनीच जामिनावर सुटल्यावर जाळून मारले होते.
 

बातम्या आणखी आहेत...