आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यातील 'मी' दरराेज स्वत: सदऱ्याप्रमाणे घालून वावरताे!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझे वो ढूंढता है रोज़ मुझमें, मैं अपने आप से भागा हुआ हूँ। बना के रोज़ जाता है मुझे वो, जो कहता है कि मैं बिगड़ा हुआ हूँ। खूप वर्षांनंतर गेल्या आठवड्यात वाया गेलेली दाेन मुले मी पाहिली. त्यांचे फाेटाे काढावेत आणि साऱ्यांना दाखवावेत असे मला वाटले, परंतु तसे केले नाही. काही गाेष्टी साऱ्यांसाठी नसतात. कारण सर्वांनाच तर कुठे माहीत आहे की, बिघडणे, वाया जाणे, मार्ग भरकटणे यातील फरक तरी काय असताे. आकाशात आभाळ दाटलेलं, हिरवी झाडे जणू धुऊन काढलीत, पिवळी पाने गळून पडलेली आणि ओलसर लाल मातीवरून भुरकट रंगाचे शूज घालून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या मुख्य मार्गावरील रस्त्यावर आलाे हाेताे. हा रस्ता एका तिकटीला मिळताे. या तिकटीच्या जवळच एका ओट्यावर सिमेंटने बनवलेली तीन माकडे बसलेली... डाेळे, कान, ताेंडावर हात ठेवलेली. ही तिघेही मला खूपच सभ्य आणि समजूतदार वाटली. खरे तर गेल्या काही दशकांपासून ते सभ्य आणि समंजस समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, परंतु आम्हीच त्यांचा संदर्भ कुठे-कुठे जाेडत असताे. ही सभ्य माकडे खऱ्याला खरे म्हणत नाहीत, बऱ्याच बाबींकडे डाेळेझाक करतात आणि बरेच काही ऐकून न ऐकल्यासारखे करतात. सभ्यतेविषयी जाे भ्रम निर्माण झाला आहे, त्याने खऱ्या माणूसपणाला घायाळ केले आहे. सभ्य माणूस या नात्याने आज आम्ही ते सारे काही बाेलू शकत नाहीत, जे बाेलायला हवे आणि ते सारे करू शकत नाहीत... जे करायला हवे. यामुळे आमच्यातच एक असा माणूस दडून बसला आहे, ज्यास सांगायचे असते मात्र काही वेगळेच. याचे छाेटेसे उदाहरण म्हणजे जेव्हा काेणी आपणास 'काय, कसे आहात?' असे विचारताे त्या वेळी 'मी खूप मजेत आहे, धन्यवाद,' असे ठाेकळेबाज उत्तर आपण देताे. खराेखरच, काय आपण खूप मजेत असताे की, काही ठीक चालले नाही हे सांगायचे नसते. जर हा प्रश्न विचारणारा आपल्यापैकी काेणी असेल तर खरे सांगायला काय हरकत आहे? आणि जर हाच प्रश्न काेणी अाैपचारिकपणे विचारला असला तरी खरे सांगण्यात काय नुकसान आहे? जर त्यास आपल्या बाबींमध्ये स्वारस्य नसेल तर पुढचे प्रश्न विचारणे आपाेआप थांबवेल. ना सोच खोलता हूँ, ना बात खोलता हूँ, वो हाल पूछता है, मैं झूठ बोलता हूँ... आपण असे का करताे? आपल्या अवतीभाेवती कागदी पुतळे का उभे करताे? नाते म्हणून केवळ नावापुरतेच का राहिलाे आपण? आपल्यात दडून बसलेला 'आणखी एक माणूस' जे खरे बाेलू इच्छिताे, ताे का बाेलत नाही? मी तर माझ्यातील 'मी'ला दरराेज सदरा घातल्याप्रमाणे अंगावर घालून का वावरताे? काेणासमाेर स्वत:ला चांगले आणि सभ्य ठरवायचे आहे मला आणि का? आत काही वेगळा आणि बाहेर काही वेगळा, ही स्थिती का बदलत नाही? न माझ्यासाठी, न समाजासाठी आणि देशासाठी? ज्याने सत्य हे कटू असते असे म्हटले ताे काेण हाेता? माझ्या मते या साऱ्या परिस्थितीस काेण जबाबदार असेल तर, ज्याने अामच्यात सत्य हे कटू असते याविषयी विश्वास निर्माण केला. आमच्याकडून आजवर जे काही माेठमाेठ्या खाेट्या बाबी बाेलल्या गेल्या त्यापैकी हेदेखील आहे. खरा तर आवळा आहे. एक जुनी म्हण आहे, 'आवळ्याचा स्वाद आणि बुजुर्गांचे बाेल' याचा प्रत्यय नंतर येताे. जसे की आवळ्याची खरी गाेड अशी चव उशिरानेच कळते. सत्यदेखील असेच आहे, जीवनातील त्याचा गाेडवा उशिरानेच कळताे. या सत्याचा स्वाद वर्षानुवर्षे टिकून राहताे. हे सभ्य माकड वाईट बाबीकडे पाहत नाही, वाईट ऐकत नाही, खाेटे बाेलत नाही. वाईट गाेष्टींकडे न पाहता त्या दूर कसे करणार? जर काही चुकीचे केले असेल तर चुकीचे का नाही ऐकावेसे वाटणार? खाेट्यास खाेटे का नाही म्हणणार? थाेडा तरी वाईटपणा घ्यावाच लागेल की नाही? या ओट्यावरील उनाड मुले या सिमेंटच्या माकडाशी खेळत हाेते. कधी त्यांच्या ताेंडावरील, कधी कानावरील अाणि कधी डाेळ्यावरील हात बाजूला सारण्याचा प्रयत्न करीत हाेते. ही मुले जणू फैजच्या या काव्यपंक्तीप्रमाणेच काही सांगण्याचा प्रयत्न करीत असावीत. इर्शाद कामिल कवी आणि गीतकार officepost.irshad@gmail.com उर्जा, साहस आणि प्रेरक असे जर काही आपल्या भवताल घडत असेल किंवा घडले असेल; अथवा आपण असे काही करीत असाल किंबहुना आपणास अशा बाबींची माहिती असेल तर आम्हाला positivestories@dbcorp.in या ईमेलवर पाठवा.

बातम्या आणखी आहेत...