Success Story / ‘रेझर-पे’ची कल्पना १०० बँकांनी फेटाळली होती, आता पाच वर्षांनंतर याद्वारे वार्षिक ३५ हजार कोटींची होते देवाण-घेवाण

३०० ग्राहकांपासून सुरू रेझर पेचा ५ वर्षांत ३.५० लाख बिझनेसकडून वापर
 

प्रशांत मिश्र

Aug 06,2019 10:31:00 AM IST

नवी दिल्ली - इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे डिजिटल पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. मात्र, डिजिटल पेमेंटची सुरुवातीची स्थिती खूप कठीण होती. या समस्यांमुळे अनेक यशस्वी स्टार्टअप्सना जन्म दिला. बिझनेस टू बिझनेस पेमेंट गेटवे रेझर पेही त्यापैकी एक आहे.


२०१४ मध्ये केवळ ३०० ग्राहकांनी रेझर पेची सुरुवात झाली. आजमितीस साडेतीन लाखांहून जास्त उद्योग आपले पेमेंट या पेमेंट गेटवेद्वारे ३५ हजार कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीतून करतात. दररोज ५ हजारांहून जास्त बिझनेस याचा वापर करतात. गेल्या वर्षी रेझर पेचा महसूल ५००% वाढला होता. २०१९ मध्ये १५० ते २०० कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. आयआयटी रुरकीमध्ये शिकलेले हर्षिल माथूर आणि शशांक कुमार परदेशात नोकरी करत होते. रेझर पेचे सीईओ आणि सहसंस्थापक हर्षिल सांगतात की, ९ ते ५ च्या नोकरीचा आम्हाला लवकरच कंटाळा आला. काही नवे करण्यासाठी आम्ही साइड प्रोजेक्ट सुरू केला. यादरम्यान आम्ही डिजिटल पेमेंट घेण्यात खूप अडथळे येते होते. यादरम्यान आम्हाला कल्पना सुचली की, या समस्येवर उपाय शोधल्यास हे सर्व ग्राहक होऊ शकतात. त्यामुळे आम्ही यावर काम सुरू केले.

‘अभियंता आहात, अभियांत्रिकी करा’ म्हणत १०० बँकांचा नकार
हर्षिल म्हणाले, डिजिटल पेमेंट गेटवेची संकल्पना आल्यानंतर आम्ही जवळपास १०० बँकांकडे गेलो. आयआयटीत शिकलात, अभियंते आहात, या पेमेंटच्या चक्रात अडकू नका, असे अनेक जण म्हणाले. शेवटी मुंबईत स्टार्टअपसारख्या बाबी जाणणाऱ्या एका तरुण बँकरला प्रस्ताव कळला आणि मदतीची तयारी दर्शवली. अखेर आपल्या बिझनेस आयडियावर विश्वास व दृढसंकल्प कामी आला. त्यामुळे सुरुवातीच्या अपयशाला पराभव मानू नये. त्यामुळे तुम्ही सतत प्रयत्न करत राहा.

एखाद्या समस्येवर उपाय सुचत असेल तरच स्टार्टअप सुरू करा
हर्षिल म्हणाले, स्टार्टअप सुरू करायचे असेल तर केवळ स्टार्टअप करू नका. मात्र, एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी स्टार्टअप सुरू करा. आमच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा बदल होता, २०१५ मध्ये अमेरिकेच्या वाय कॉम्बिनेटर प्रोग्राम याअंतर्गत ओरिजन स्टार्टअप कल्पनेस निधी दिला जातो. यामध्ये निवडलेले आम्ही दुसरे भारतीय होतो. आम्हाला ६५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. पहिल्याच दिवशी आमच्यासोबत ३०० कंपन्यांनी करार केला. व्यवसायाशी संबंधित मोठ्या समस्येवर उपाय शोधल्याने हे झाले.

रेझर-पेने आतापर्यंत एकूण ७३८ कोटी रुपयांचा निधी जमवला
रेझर-पेने पाच वर्षांच्या प्रवासात ७३८ कोटी रुपयांचा निधी जमवला आहे. नवीन स्टार्टअप फंड कसा जमा करावा? या प्रश्नावर हर्षिल म्हणाले, नवीन लोकांनी कंपनीच्या विकासावर लक्ष द्यावे. कंपनीची वाढ योग्य असेल तर गुंतवणूकदार स्वत: तुमच्याकडे येतील. गेल्या वर्षी आमचा महसूल ५००% वाढला आहे. मासिक वाढ १० ते १५ पट आहे. पुढील वर्षी ४००% वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्टार्टअपला निधी व प्रोत्साहनासाठी अनेक कार्यक्रम होतात. त्यात जाऊन कल्पना मांडा. कल्पना दमदार असेल तर गुंतवणूकदार मिळतील.

X
COMMENT