आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे दिले नाही म्हणून भाळवणी येथे मूर्तीची केली जाळपोळ; स्वप्निल शिंदे याला अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पारनेर - मूर्तीचा काही भाग जाळला, तसेच मूर्ती तयार करण्यासाठीच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी स्वप्निल सुरेश शिंदे याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 
नगर येथील प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद दत्तात्रय कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यातील पाटोदे तालुक्यातील सावरगाव येथील २५ फूट उंचीच्या मूर्तीचे काम शिल्पकार कांंबळे यांना मिळाले होते. नगर येथील स्टुडिओत जागा नसल्याने त्यांचा मुलगा शुभंकरने मित्र निखिल सुरेश शिंदे याच्या भाळवणीतील आरती प्लास्टिक कारखान्यातील जागा दाखवली. जागेचे भाडे किती द्यायचे, यासंदर्भात कांबळे यांनी विचारणा केली असता भाड्याची आवश्यकता नाही. जे काही वीजबिल येईल, त्यापैकी निम्मे कांबळे यांनी द्यावे असे ठरले. ऑक्टोबरमध्ये काम सुरू झाले. या कालावधीत आलेले विजेचे १ लाख १६ हजार रूपयांचे बिल निखिलचा मोठा भाऊ स्वप्निल याच्याकडे कांबळे यांनी सुपूर्द केले. प्लास्टिकबंदीमुळे कारखान्यास सील लावले गेेले असताना डिसेंबरच्या अखेरीस स्वप्निल शिंदे याने कांबळे यांच्याकडे पुन्हा दीड लाखाची मागणी केली. काम पूर्ण झाल्यावर पैसे देतो, असे कांबळे यांनी सांगितले असता शिंदे याने काम करू नका, असे सांगत कांबळे यांची अडवणूक केली. त्यामुळे कांबळे यांनी त्याला ६ जानेवारीला दीड लाख रूपये दिले. 


७ जानेवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास कांबळे यांच्यासह कारागीर जितेश पांडे, प्रीतम पवार, बाळकृष्ण विसपुते, तसेच इतर लोक आरती प्लास्टिक कारखान्यात गेले असता कलाकृतीच्या पाठीमागचा भाग तोडला असल्याचे दिसले. तेथे असलेले १२ हजार रूपये किमतीचे वेल्डींग मशीन, १५०० रूपयांचे हॅन्ड ग्राईंडर, १६०० रूपयांचे ड्रील मशीन, १८०० रूपयांचे वूडकटर असे एकूण १६ हजार ९०० रूपयांचे साहित्यही आढळले नाही. कांबळे यांनी स्वप्निल शिंदेशी संपर्क केला असता आपण तिकडे आलो नाही, त्याबाबत काहीही माहिती नाही असे उत्तर त्यांनी दिले. हे साहित्य शिंदे यानेच चोरल्याचे कांबळे यांचे म्हणणे आहे. कांबळे यांनी शेजारी राहणारे लक्ष्मण रोहोकले यांच्याकडे विचारणा केली असता स्वप्निल शिंदे यानेच कलाकृती जाळल्याचे समजले. मूर्तीच्या पाठीमागील बाजूची रचना जाळून ५ लाखांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी ९ जानेवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे रविवारी पडसाद उमटले. 

 

बातम्या आणखी आहेत...