आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस 5,600 रुपयांपर्यंत घसरला; निर्यात मंदावल्याचा परिणाम, दर घसरणीने बळीराजा निराश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मागील महिन्यात ५९५० रुपयांवर गेलेल्या कापसाचे दर निर्यात घसरल्यामुळे स्थानिक बाजारात ५६०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे मोठ्या आशेने भाव वाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याची दराच्या घसरणीमुळे निराशा झाली आहे. 

 

जिल्ह्यात यावर्षी कपाशीच्या पिकाची स्थिती समाधानकारक नाही. पावसाअभावी तीन-चार वेच्यातच कपाशीचे पिक रिकामे होत आहे. दरम्यान सोयाबीन, मुग, उडीद, संत्रा आदी प्रमुख पिकांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे. दरम्यान यावर्षी वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे बोंडअळीचाही फारसा फटका शेतकऱ्यांना बसला नसला तरी दुष्काळी स्थितीचा कपाशीला जबर फटका बसला आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

मागील महिन्यात कापसाचा हंगाम सुरू झाला त्यावेळी कपाशीचे दर स्थानिक बाजारात ५९५० रुपयांवर पोहचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसापासून मोठ्या प्रमाणात आशा निर्माण झाल्या होत्या. दरम्यान सध्या कापसाचे निम्म्याहून अधिक पीक घरी आले आहे. परंतु किमान सहा हजार रुपये भाव मिळावे व एकाच वेळी संपुर्ण कापूस विकावा या उद्देशाने शेतकऱ्यांनी चढे दर असतानाही कापसाची विक्री केली नाही. दरम्यान डिसेंबरच्या सुरवातीपासून कापसाच्या दरात घसरण सुरू होऊन आज येथील स्थानिक बाजारात कापसाला ५६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

 

वायदे बाजारातही मंदी 
कापसाचा हंगाम सुरू झाल्यापासून देशातून कापसाची मोठ्या प्रमाणात चीन मध्ये निर्यात सुरू होती. परंतु चीनने सध्या आयात थांबवल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात भाव कोसळल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वायदे बाजारातही मंदी आल्याने कापसाचे दर ७५.२४ सेंट प्रति पौंडवर आल्याने कापसाच्या खासगी बाजारात मंदी दिसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...