आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुष्य नक्षत्राचे महत्त्व, या मुहूर्तावरच का केली जाते खरेदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्राव्यतिरिक्त वेद आणि पुराणांमध्ये पुष्य नक्षत्रवाविषयी विशेष महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामुळे हे नक्षत्र अत्यंत खास मानले जाते. पुष्य नक्षत्रामध्ये विवाह सोडून इतर सर्व मंगल आणि महत्त्वपूर्ण कार्याची सुरुवात केली जाते. यासोबतच या नक्षत्रामध्ये खरेदी आणि गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. येथे जाणवून घ्या, पुष्य नक्षत्राचे महत्त्व. यावर्षी दिवाळीपूर्वी 22 ऑक्टोबर, मंगळवारी पुष्य नक्षत्र आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्र सांगण्यात आले असून यामध्ये 8 व्या स्थानावर पुष्य नक्षत्र येते. शास्त्रामध्ये याचे महत्त्व जास्त सांगण्यात आले आहे. हे अत्यंत शुभ नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र स्थायी असल्यामुळे या काळात करण्यात आलेली खरेदी स्थायी आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी मानली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आणि अधिष्ठाता बृहस्पती देव आहेत. यामुळे पुष्य नक्षत्रामध्ये करण्यात आलेले काम शनीच्या प्रभावामुळे स्थायी स्वरूपात फायदा करून देते तर बृहस्पती देव त्या कामामुळे समृद्धी प्रदान करतात.

'पाणिनी संहिता'मध्ये लिहिण्यात आले आहे की.. "पुष्य सिद्धौ नक्षत्रे" 

सिध्यन्ति अस्मिन् सर्वाणि कार्याणि सिध्यः | 

पुष्यन्ति अस्मिन् सर्वाणि कार्याणि इति पुष्य ||

अर्थ : पुष्य नक्षत्रामध्ये सुरु करण्यात आलेले सर्व कार्य पुष्टीदायक, सर्वथा सिद्ध होतातच. 

1.पुष्यला नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. हे नक्षत्र आठवड्यातील विभिन्न वारांसोबत मिळुन विषेश योग बनवते. या सर्वांचे आपले एक विषेश महत्त्व असते. रविवार, बुधवार आणि गुरुवारी येणारा पुष्य नक्षत्र अत्याधिक शुभ असतो. ऋग्वेदामध्ये याला मंगलकर्ता, वृध्दिकर्ता, अनंत कर्ता किंवा शुभ म्हटले जाते.

2.हिंदू पंचांगाच्या प्रत्येक महिन्यात आपल्या क्रमानुसार विभिन्न नक्षत्र चंद्रमासोबत संयोग करतात. जेव्हा हा क्रम पूर्ण होतो तेव्हा त्याला एक चंद्र मास म्हटले जाते. या प्रकारे प्रत्येक महिन्यात पुष्य नक्षत्रचा शुभ योग बनतो. दिवाळीपूर्वी येणारे पुष्य नक्षत्र खुप शुभ मानले जाते कारण, दिवाळीपूर्वी केल्या जाणा-या खरेदीसाठी हे शुभ असते. यावेळी तुम्ही जी वस्तु घ्याल ती दिर्घकाळ आपल्या उपयोगात येते.

3.नक्षत्रांविषयी आपल्या धर्म ग्रंथांच एक कथा आहे. त्यानुसार 27 नक्षत्र हे ब्रम्ह देवांचा पुत्र दक्ष प्रजापतिच्या 27 कन्या आहेत. या सर्वांचा विवाह दक्ष प्रजापतिने चंद्रासोबत केला होता. चंद्राचा विभिन्न नक्षत्रांसोबत संयोग पति-पत्निच्या निश्चल प्रेमाचे प्रतिक आहे. अशा प्रकारे चंद्र वर्षानुसार, महिन्यातुन एकदा चंद्र पुष्य नक्षत्रासोबत संयोग करतो.

4.पुष्य नक्षत्राचे देवता बृहस्पति आहेत. जे सदैव शुभ कर्मांमध्ये वृद्धी करतात. ज्ञान वृध्दि आणि विवेक दाता आहे. तसेच या नक्षत्राचे दिशा प्रतिनिधी शनि आहेत, ज्यांना स्थावर असेही म्हटले जाते याचा अर्थ स्थिरता असा होतो. याच कारणामुळे या नक्षत्रात केलेली कामे चिर स्थायी होतात.

5. प्राचीन ज्योतिषी ग्रंथांनुसार, पुष्य नक्षत्रावर अनेक बारीक तारे आहेत जे कांति वृत्तपासुन खुप जवळ आहेत. मुख्य स्वरुपात या नक्षत्राचे तीन तारे आहेत. जे एका बाणाच्या आकृती प्रमाणे आकाशात दिसतात.

6. आकाशात याचा गणितीय विस्तार 3 राशि 1 अंश 20 कला ते 3 राशि 16 अंश 40 कला पर्यंत आहे. हे नक्षत्र विषुपत रेखा पासुन 18 अंश 9 कला 56 विकला उत्तरेमध्ये स्थिर आहे. या नक्षत्रामध्ये शिल्प, चित्रकला, अभ्यास व वाहन खरेदी करणे उत्तम मानले जाते. यामध्ये मंदिर निर्माण, घराचे निर्माण आदि कामे देखील शुभ मानले जातात.

बातम्या आणखी आहेत...