आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Income Up To 5 Lakhs Is Now Fully Tax Free; The Result Of This Announcement Of The Government On Taxpayers Is ...

मित्रों..5 लाखांपर्यंतचे उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त; करदात्यांवर सरकारच्या या घोषणेचा परिणाम असा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> करदाता- स्टँडर्ड डिडक्शन 40 हजारांवरून वाढवून 50 हजार रुपये.

 

> शेतकरी- 5 एकरांपर्यंत मालकी असलेल्यांना दरवर्षी 6 हजार रुपये

 

> कामगार- दरमहा 100 रु. जमा केल्यास वयाच्या 60 व्या वर्षी तीन हजारांची पेन्शन

 

सर्वात आधी करदाता
तीन कोटींपेक्षा जास्त करदात्यांना मिळेल फायदा

पाच लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांना आता करात पूर्ण सूट. देशात एकूण 6.65 कोटी करदाते आहेत. या नव्या सवलतीमुळे त्यांच्यापैकी तीन कोटींपेक्षा करदात्यांचा फायदा होणार आहे. 


5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांचे काय?
पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी जुनाच टॅक्स स्लॅब कायम राहील. अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला फक्त 10 हजारांची थेट कर सवलत मिळाली. 5 लाखांपेक्षा जास्त वेतनधारकांची प्रमाणित वजावट (स्टँडर्ड डिडक्शन) 40 हजार रुपये होती. ती 50 हजार रुपये केली आहे. 
> बँक आणि पोस्टातील बचतीवर मिळणाऱ्या व्याजावरील टीडीएस सवलतीची मर्यादा 10,000 वरून वाढवून 40,000 रुपये केली आहे.

 

करदात्यांवर सरकारच्या या घोषणेचा परिणाम असा...


> करपात्र उत्पन्न 5 लाख रु. असेल तर कर शून्य टक्के...

6 लाख उत्पन्न

असल्यास

2.5 लाखांवर शून्य कर

10 लाख उत्पन्न असल्यास
2.5 लाखांवर शून्य कर
1.5 लाखांचे उत्पन्न असल्यास
2.5 लाखांवर शून्य कर

2.5 लाखांवर 5% 

म्हणजेच 12,500

2. 5 लाखांवर 5% म्हणजेच 12,500

2.5 लाखांवर 5%

म्हणजे 12,500

उर्वरित 1 लाखावर 20% म्हणजेच 20,000

उर्वरित 5 लाखांवर 
20% म्हणजेच 1 लाख

उर्वरित 5 लाखांवर 30%  म्हणजेच  दीड लाख

एकूण कर 32,500 एकूण कर 1,12,500 एकूण कर 2,62,500

 

मात्र अटी लागू
अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्टपणे म्हणाले, ‘करांत बदलाच्या तरतुदी नवे सरकारच लागू करेल. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस करदात्यांना टॅक्स रेट व सूट स्पष्ट कळावी म्हणून मी कर प्रस्ताव मांडतोय.’ निवडणूक एप्रिल-मेमध्ये होईल. यामुळे एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात जुनेच स्लॅब असतील. 
 

 

बातम्या आणखी आहेत...