आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील आयटी बाजार 6.9 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -   भारतीय आयटी बाजार वार्षिक ६.९ टक्क्यांच्या दराने वाढत आहे. पुढील वर्षी हा ७.९ टक्क्यांच्या तेजीने वाढण्याचा अंदाज आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत हा बाजार ९१,१६० कोटी रुपयांपर्यंत, तर  डिसेंबर २०१९ पर्यंत हा ९८,२३० कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. आयटी क्षेत्रातील सल्लागार संस्था आयडीसी इंडियाच्या वतीने अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अहवालानुसार २०१८ च्या पहिल्या सहामाहीत एकूण आयटी खर्चात ७८ टक्के भागीदारी आयटी सेवा क्षेत्राची राहील. हा आकडा वर्षाच्या अखेरपर्यंत ७०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा 
अंदाज आहे.  


आयडीसी इंडियाचे संचालक एंटरप्राइज रंगनाथ सदाशिव यांनी सांगितले की, “२०१७ मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मंदी दिसून आली होती. या वर्षी पहिल्या सहामाहीदरम्यान तेजी दिसून आली आहे. सरकारच्या वतीने विविध मुद्द्यांवर तंत्रज्ञान खर्चात करण्यात येत असलेल्या वाढीचे यात महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे आयटी सेवा विशेषकरून सिस्टिम अपग्रेडेशन क्षेत्रातील मागणीत सलग वाढ झाली आहे. याचा पुढील एक ते दोन वर्षांत आयटी बाजारावर चांगला परिणाम होण्याची अपेक्षा आहे.’  


त्यांनी सांगितले की, “आयटी सर्व्हिसेस मध्ये विशेष करून होस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस, होस्टेड अॅप्लिकेशन्स मॅनेजमेंट, अॅप्लिकेशन्स मॅनेजमेंट अँड आयटी कन्सल्टिंग यातील घडामोडींमध्ये तेजीने वाढ होत आहे. क्लाउड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या (आयओटी) पुढे येत असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणी गेल्या तीन ते पाच वर्षांपासून कायम आहे.’  

 

ऑटोमेशनमुळे एचआरच्या खर्चात बचत : टीमलीज  
ऑटोमेशनची प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी डाटा मॅनेजमेंटमुळे कंपनीच्या एचआर व्यवस्थापनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे.  यात ६५ टक्क्यांपर्यंत ची बचत होत आहे. देशातील प्रमुख ऑनलाइन जॉब पोर्टल टीमलीजने मंगळवारी एका अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार एचआर विभाग तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याने त्यांचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यासाठीचा खर्च ८० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...