आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Industry Mourned The Death Of Makeup Artist Subhash Vagal, Anushka Sharma Said He Was A Master

मेकअप आर्टिस्ट सुभाष वगल यांच्या निधनाने बॉलिवूड शोकाकूल, अनुष्का शर्मा म्हणाली - ते उस्ताद होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुभाष वगल यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. सुशाष यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ आणि भावनिक पोस्ट लिहून इंडस्ट्रीच्या 'सुब्बू'चे स्मरण केले. सुब्बू नावाने ते इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. बॉलिवूडमधून माधुरी दीक्षित, डब्बू रत्नानी, मनीष रत्नानीसह अनेकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला...

  • रेस्ट इन पीस सुब्बु: अनुष्का शर्मा

अभिनेत्री  अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सुब्बू यांच्या आठवणींना उजाळा दिला. तिने लिहिले, ते अतिशय नम्र आणि कमालीचे व्यक्ती होते. मी त्यांना उस्ताद म्हणून हाक मारायचे. सुब्बू देशातील सन्मानित मेकअप आर्टिस्टपैकी एक होते. त्यांनी त्यांच्या कौशल्याने मला कायम सुंदर बनवले आणि ते आपल्या प्रत्येक सुंदर कामासाठी कायम स्मरणात राहतील. एक चांगला मुलगा, भाऊ आणि सुंदर आत्मा आपल्यातून कायमची निघून गेली, रेस्ट इन पीस सुब्बू.   

  • आता आम्ही कधीही बोलू शकणार नाही, यावर विश्वास बसत नाही - कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ यांनीही सुब्बू यांना श्रद्धांजली वाहिली. आता यापुढे आम्ही कधीही बोलू शकणार नाही, यावर माझा विश्वास बसत नाहीये. खूप मोठे नुकसान झाले आहे, असे कतरिना म्हणाली. सुभाष पहिले मेकअप आर्टिस्ट होते, ज्यांच्यासोबत कतरिनाने काम केले होते. कतरिनाने सांगितल्यानुसार, सुभाष अतिशय प्रतिभावंत होते. तुम्ही खूप लवकर निघून गेलात, रेस्ट इन पीस सुब्बू, तुम्ही कायम माझ्या स्मरणात राहाल, अशा शब्दांत कतरिनाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

सुभाष वगल हे इंडस्ट्रीतील अतिशय प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टपैक एक होते. त्यांनी लारा दत्ता, करण जोहर, सोनम कपूर, प्रीती झिंटा, बिपाशा बसूसह अनेक नावाजलेल्या कलाकारांसोबत काम केले होते.  देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशा शब्दांत करण जोहरने त्यांना श्रद्धांजली वाहिली.   

बातम्या आणखी आहेत...