आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांडव वनवासात असताना भेटीला गेले होते श्रीकृष्ण..सत्यभामा आणि द्रौपदीमध्ये झाले असे संभाषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क - पांडव वनवासात असताना काम्यक अरण्यात राहत होते. एके दिवशी श्रीकृष्ण आणि सत्यभामा त्यांना भेटायला तिथे गेले होते. पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या भविष्यातील कुटनीतीवर चर्चा झाली होती. ही चर्चा सुरु असताना सत्यभामा आणि द्रौपदी या दोघी गप्पा करत होत्या. यादरम्यान, सत्यभामा हिने द्रौपदीला काही प्रश्नही केले. तिने द्रौपदीला विचाराले, तुझे पती एवढे शूरवीर आहेत. ते तुझ्यासोबत किती प्रेमाने वागतात. विशेष म्हणजे ते तुझ्या नियंत्रणात असतात. तू त्यांच्यासोबत कशी वागते.


त्यावर द्रौपदीने सत्यभामा हिला सांगितली ही महत्त्वपूर्ण माहिती...

द्रौपदी म्हणाली, अहंकार, काम, क्रोध सोडून निर्मळ मनाने मी पांडवांची सेवा करत आहे. मी खोटे बोलत नाही. असभ्यतेने त्यांच्याशी वागत नाही, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करते, वाईट ठिकाणी जात नाही. 


- देव, मनुष्य, गंधर्व, धनी अथवा रूपवान पुरुष दिसला असो परंतु पांडवांव्यतिरिक्त माझे मन इतरत्र भरकटही नाही, पतीच्या भोजनाआधी मी भोजन करत नाही, त्यांनी स्नान केल्यानंतरच मी स्नान करते. ते बसल्याशिवाय मी बसत देखील नाही.

 

- मी घरातील सर्व भांडे स्वच्छ करते, चविष्ट भोजन बनवते, वेळेवर जेवण करते, घर स्वच्छ ठेवते, कोणाचा तिरस्कार करत नाही.

 

- वारंवार दरवाज्यामध्ये उभी राहत नाही, आळस दूर ठेवते. पतीसोबत भोजन करत नाही, चांगले वस्त्र परिधान करून मिरवत नाही आणि सासूसोबत भांडणही करत नाही.

 

- महाराज युधिष्ठीर यांनी इंद्रप्रस्थमध्ये राज्य स्थापन केले तेव्हा सर्व जमाखर्चांचा तपशील मीच ठेवत होते. अशाप्रकारे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे मी तंतोतंत पालन करते.

बातम्या आणखी आहेत...