आयफोन-एक्सआरला मागणी नसल्यामुळे / आयफोन-एक्सआरला मागणी नसल्यामुळे उत्पादनात केली कपात

वृत्तसंस्था

Nov 07,2018 09:21:00 AM IST

तैपेई - अॅपलच्या नव्या आयफोन-एक्सआरची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे या फोनची असेंब्लिंग करणाऱ्या कंपन्या फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनने या फोनचे उत्पादन कमी करण्यास सांगितले आहे. जपानमधील आर्थिकविषयक वृत्तपत्र निक्केईनुसार तैवानमधील फॉक्सकॉनला उत्पादनात दररोज एक लाख युनिट कमी करण्यास सांगण्यात आले आहे. जुन्या ऑर्डरच्या तुलनेत हा आकडा २० ते २५ टक्के कमी आहे.


अहवालानुसार फॉक्सकॉनने आयफोन-एक्सआर बनवण्यासाठी ६० असेम्ब्ली लाइन तयार केल्या होत्या. मात्र, आता केवळ ४५ लाइनवरच उत्पादन सुरू आहे. अॅपल, फॉक्सकॉनचा सर्वात मोठा ग्राहक आहे. तैवानमधीलच कंपनी पेगाट्रॉननेही उत्पादन कमी केले आहे. आणखी एक पुरवठादार विस्ट्रॉननेही उत्पादनाची गती मंद करण्याचे सांगितले आहे.


सप्टेंबर तिमाहीतील निकालाची घोषणा करताना सीईओ टिम कुक यांनी डिसेंबर तिमाहीमध्ये मागणी कमी राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर अॅपलच्या शेअरमध्ये ७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. आयफोन-एक्सआरची मागणी कमी झाल्याच्या वृत्ताने सोमवारी शेअरमध्ये पुन्हा ४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

X
COMMENT