आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीत गुंडांचा मुद्दा पुढे येताच 32 जणांचा केला हद्दपारीचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याचा मुद्दा आमदार अनिल गोटे यांनी आक्रमकतेने मांडला. त्यानंतर निवडणुकीतील गुंडांच्या मुद्द्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटत असताना गुरुवारी पोलिस विभागाने ३२ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव काढला. यामध्ये नगरसेविकेचा पती व मुलांचाही समावेश आहे. तर आमदार अनिल गोटे यांचा विरोध असलेल्या देवा सोनारचा मात्र या यादीत समावेश केलेला नाही. ३२ जणांची गुन्हेगारी कुंडली पाहून कारवाई केली. दबावाखाली नाही, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.


निवडणुकीतील गुंडगिरीचा धुळ्यातील हा विषय राज्यात चर्चेचा ठरला. दुसरीकडे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी संवाद साधल्याचे सांगितले जाते. या स्थितीत गुरुवारी सायंकाळी पोलिस प्रशासनाने ३२ हद्दपारांची यादीच जाहीर केली. या सर्व ३२ जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे म्हटले अाहे. यामध्ये शहरातील भीमनगर, स्टेशन रोड, चैनीरोड व घड्याळवाली मशीद परिसरातील तरुणांचा समावेश आहे; परंतु या ३२ जणांच्या यादीत पक्ष प्रवेशाच्या वेळी आमदार अनिल गोटे यांचा विरोध असलेल्या देवेंद्र उर्फ देवा सोनार याचा कोठेही उल्लेख नाही. देवा सोनारवर यापूर्वी कारवाई झाली होती.


त्याचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्र विभागातून परत आलेला अाहे. त्यामुळे देवा सोनारवर पुन्हा कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. निवडणुकीच्या पूर्वी पोलिसांनी घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह आहे.

 

कथित गोटे समर्थकांचाही सहभाग...
या ३२ जणांच्या यादीमध्ये आमदार अनिल गोटे यांचे समर्थक म्हणवून घेणाऱ्यांचाही समावेश आहे. किमान दीड-दोन वर्ष मागील घटना पाहिल्यास त्याची प्रचिती येते. त्यापैकी गुड्ड्या खून खटल्यानंतर पेटलेला वाद आणि जाहीर पत्रकार परिषदेतील धिंगाणा, पेट्रोल पंपाजवळ काढलेले पिस्तूल, नगरसेविकेच्या घरावर दगडफेक अन‌् पोलिसांच्या पिस्तूल जप्तीच्या कारवाईत पहिल्याच दिवशी हाती आलेल्या संशयिताचाही समावेश आहे. याशिवाय चक्क १०० ते १२५ जणांच्या ग्रुपने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचाही समावेश आहे.


पाहिली गुन्हेगारी कुंडली
हद्दपार करण्यात आलेल्या सर्व ३२ जणांवर गेल्या सात ते आठ वर्षांतील रेकॉर्ड पोलिसांनी पाहिले. ही सर्व माहिती संकलित केल्यानंतर हद्दपारीची कारवाई झाली. शिवाय ती राबवताना कोणताही राजकीय दबाव नव्हता. समाजहिताच्या अनुषंगाने नियमितपणे ही प्रक्रिया राबविली. -विश्वास पांढरे, पोलिस अधीक्षक


... यांची हाेईल हद्दपारी
भीमनगर परिसरातील किरण दादाभाऊ ढिवरे, आकाश प्रकाश येवलेकर, अनिल भाईदास पाटील, रोहित प्रभाकर सोनवणे, सचिन रमेश लोंढे, गौरव संजय इंगळे यांना हद्दपार केले आहे. याशिवाय स्टेशनरोड येथील संभा उर्फ समाधान देविदास निकम, रियाज रज्जाक शेख , भट राजेश गवळी, पवन रमेश माळी, कपिल सुभाष शिंदे, ललित ज्ञानेश्वर मराठे, विनोद छगन बेलदार, राकेश सुरेश पिंपळे, नगरसेविका पुत्र विक्की उर्फ विक्रम महादेव परदेशी, स्वप्निल महादेव परदेशी, महादेव उर्फ महादू चैत्राम परदेशी, संतोष रवींद्र परदेशी, करण रवींद्र परदेशी, धीरज रामेश्वर परदेशी, योगेश सुभाष अजबे, प्रशांत बाबूराव माने, गल्ली क्र. पाचजवळील मंगल गिरधर गुजर, अमोल मधुकर जाधव, सुनील बंडू गवळी, पंकज उर्फ शेरा गणेश सूर्यवंशी (चाैधरी), धर्मराज गिरधर गुजर, कार्तिक दिलीप अग्रवाल, आकाश विनोद गुजर, रोशन भटू पारखे, मुकेश मोहन बारी, मोहन टकले यांचा समावेश आहे.अा.गाेटेंनी भाजपमधील गुंडगिरीवर झाेड उठवल्यानंतर गृह विभागातर्फे दखल

बातम्या आणखी आहेत...