आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायली संजीवच्या लग्नाचा रंगतदार बस्ता 3 एप्रिलला, मराठी चित्रपट 'बस्ता'चे पोस्टर लॉन्च

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : लग्न म्हटले की, बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार "बस्ता" चित्रपटातून ३ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.


हा चित्रपट श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत आहे. सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी "बस्ता" चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे. 

मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरमध्ये दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असे हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल अशी अपेक्षा आहे.