आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेनमेंट डेस्क - कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) ने टीव्हीवर पुनरागमन केले आहे. कपिलचा शो 'द कपिल शर्मा शो सीझन 2' (The Kapil Sharma Show) 29 डिसेंबरपासून टीव्हीवर ऑन एयर होत आहे. तथापि, याबाबत कपिलने शोसाठी आपल्या फीसमध्ये मोठी कपात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वेळी कपिलला एका एपिसोडसाठी फीस म्हणून 17-20 लाख रुपये दिले जात आहेत. दुसरीकडे, मागच्या सीझनमध्ये कपिल एका एपिसोडसाठी 60 ते 80 लाख रुपये चार्ज करायचा. कपिलच्या फीसमध्ये झालेल्या कपातीवर त्याचे सहकारी कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) ने यामागचे सत्य सांगितले. त्याने फीसमध्ये कपात झाल्याची बाब अफवा असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, सर्वांनाच चांगली फीस मिळत आहे. पैसा हा दुय्यम आहे.
- कृष्णा अभिषेक म्हणाला- 'सर्व कलाकार खूप खुश आहेत. आम्हा सर्वांचा पहिला उद्देश एकत्र काम करणे आहे. पैसे तर दुय्यम आहेत.' कृष्णाने शोचे कौतुक करताना म्हटले की, 'कपिल शर्मा शो टीव्ही जगतातील सर्वात मोठा कॉमेडी शो आहे. याला कोणीही नाकारू शकत नाही.' यंदा हा शो सलमान खान प्रॉड्यूस करत आहे.
कपिलच्या शोमध्ये कृष्णा आणि भारतीला मिळतेय एवढी फीस
'द कपिल शर्मा शो' सीझन 2 साठी कपिलला जेथे 17-20 लाख रुपये प्रति एपिसोड मिळताहेत, तिथेच कृष्णा अभिषेक एका एपिसोडसाठी 12 लाख रुपये घेत आहे. पहिल्या सीझनमध्ये काही काळासाठी कपिलच्या शोची मेंबर राहिलेली भारती सिंह हिलाही 10 ते 12 लाख रुपये मिळत आहेत. कपिलच्या शोमध्ये किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकरही दिसताहेत.
सलमानने सांगितले केव्हा करणार लग्न
सलमान खान कपिलच्या शोमध्ये वडील सलीम खान आणि दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल खानसोबत पोहोचला होता. कपिलने शोमध्ये लग्नाचा विषय काढून सलमानला अडचणीत आणण्याचा प्रयत्नही केला. त्याने विचारले- 'लग्नाचा सीझन सुरू आहे, दीपिका-प्रियंकाने लग्न केले आहे. मग विषय बदलून विचारले- 'भारत'मध्ये तुमचा काय रोल आहे?'
- सलमानने उत्तर देताना सांगितले- 'भारतमध्ये माझे लग्न होत नाही, जोपर्यंत मी 72 वर्षांचा होत नाही. आणि मी हीच बाब फॉलो करत आहे.' यावर कपिल विनोद करत म्हणाला- 'भाई स्क्रिप्ट तर आताच लिहिली आहे, मग त्याच्या आधी तुम्ही कुणाला फॉलो करत आहात?' हे ऐकून सलमानच नाही, तर सोहेल-अरबाज यांनाही हसू आवरले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.