• Home
  • Gossip
  • The Kapil Sharma Show : Akshay Kumar was Kajol's tremendous crush, close friend Karan Johar revealed

द कपिल शर्मा / द कपिल शर्मा शो : अक्षय कुमारवर होता काजोलचा जबरदस्त क्रश, क्लोज फ्रेंड करण जोहरने केला खुलासा

करणने आपल्या खऱ्या नावाचा खुलासा केला... 
 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 29,2019 04:26:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : करण जोहर क्लोज फ्रेंड काजोलसोबत 'द कपिल शर्मा शो' मध्ये पोहोचला होता. यादरम्यान त्याने खुलासा केला की, काजोलचा क्रश अक्षय कुमार होता. करनणे सांगितले, "मी काजोलला फिल्म हिनाच्या प्रीमियर पार्टीमध्ये भेटलो होतो. काजोलचा अक्षय कुमारवर खूप जास्त क्रश होता आणि पूर्ण प्रीमियरमध्ये ती त्यालाच पाहत होती. त्यावेळी मी काजोलच्या सपोर्टमध्ये होतो. त्यामुळे आम्ही दोघे पूर्णवेळ इव्हेंटमध्ये अक्षयला शोधत होतो. आम्हाला अक्षय तर नाही भेटला पण, पण आमची मैत्री झाली. आम्ही दोघेही साउथ मुंबईमध्ये राहतो आणि आमची मैत्रीही तिथेच डेव्हलप झाली." अक्षय आणि काजोलने फिल्म 'ये दिल्लगी' मध्ये एकत्र काम केले आहे.

काजोलला लक्षात राहत नाही करणचा बर्थडे...
करणने कपिलच्या शोमध्ये खुलासा केला की, काजोलला तिचा बर्थडे लक्षात राहत नाही. तो म्हणतो, "आम्ही खूप पूर्वीपासून मित्र आहोत. पण तिला कधीच माझा वाढदिवस लक्षात राहत यानाही. ती एकतर एक दिवस आधी बर्थडे विश करते किंवा एक दिवस नंतर." त्यानंतर करणने काजोलचे कौतुक करत सांगितले की, तिला नाती खूप छान मेंटेन करता येतात.

करणचा ड्रेसिंग सेंस पाहून हसायची काजोल...
काजोलने शोमध्ये सांगितले की, जेव्हा करणला पहिल्यांदा पहिले होते तेव्हा तिला तिचे हसू आवरले नव्हते. ती म्हणाली, "डिस्कोथेकवर एक पार्टी होती. मिस्टर जोहर तिथे थ्री पीस सूटमध्ये आले आणि मला माझे हसू आवरले नाही, असे वाटले की, हा कसा माणूस आहे." याच इंसिडेंटविषयी बोलताना करण म्हणाला, "मी केवळ 17 वर्षांचा होतो आणि मी सूट घातला होता, असा विचार करून की, फ़िल्मी पार्टीमध्ये लोक असेच कपडे घालत असतील. तनु आंटी (काजोलची आई तनुजा) ने मला डान्स करण्याचा सल्ला दिला. जेव्हा मी डान्स करायला चाललो होतो तेव्हा काजोल मला पाहून अर्धा तास हसत होती. मला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले आणि मी पार्टी सोडून निघऊबा गेलो. कारण माझ्या आयुष्यात माझा असा अपमान कधीच झाला नव्हता."

काजोलचे नाव मर्सिडीज ठवू इच्छित होते तिचे वडिल...
काजोलनुसार, तिचे वडील शोमू मुखर्जी तिचे नाव मर्सिडीज ठेऊ इच्छित होते. काजोल म्हणाली, "जर एखादा माणूस आपल्या कंपनीचे नाव आपल्या मुलीच्या नावावर ठेऊ शकतो तर एखादि व्यक्ती एखाद्या कामपणीच्या नावावर आपल्या मुलीचे नाव का नाही ठेऊ शकत."

करणने आपल्या खऱ्या नावाचा खुलासा केला...
करणने खुलासा केला की, त्याचे खरे नाव राहुल आहे. तो म्हणाला, "माझ्या जन्मपत्रिकेत माझे नाव राहुल कुमार जोहर आहे, पण पासपोर्टवर करण. पेरेंट्सने मला राहुल नाव दिले, पण जन्माच्या 6 दिवसांनंतर पहिले की, माझे नाव करण असायला हवे आणि त्यांनी माझे नाव बदलले."

X
COMMENT