आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका म्हणते रणवीरला कप्पूचे भाऊजी, हे ऐकून इमोशनल झाला कपिल शर्मा तर रणवीर खळखळून हसला, सिद्धूनेही केली \'बाबाजी का ठुल्लू\' ची पोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 29 डिसेंबरपासून 'द कपिल शर्मा शो' सुरु झाला आहे. कपिल शर्मा शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवले गेले आहे की, शोमध्ये पहिल्या दिवशी 'सिम्बा' ची टीम म्हणजेच रणवीर सिंह, सारा अली खान, सोनू सूद आणि रोहित शेट्टीहे सर्व आले होते. या चौघांसोबत कपिल आणि त्याच्या टीमने खूप मस्ती केली. शोमध्ये कॉमेडियन चंदन प्रभाकर दीपिका पादुकोणवरून कपिलची खिल्ली उडवली. चंदन प्रभाकर  म्हणाला, 'दीपिका, रणवीरला लग्नानंतर कप्पूचे भाऊजी म्हणून बोलावते. हे ऐकून कपिल दुखी झाला तर रणवीर खूप हसला. नवजोत सिंह सिद्धूनेही यागोष्टीवर कपिलची खूप चेष्टा केली होती. मग सिद्धूने कपिलसाठी 'बाबाजी का ठुल्लू' वाला डान्सही केला. एवढेच नाही तर शोमध्ये बच्चा यादव दूधवाला बनला तर कपिलचा को-स्टार कीकू शारदानेही रणवीरसोबत खूप धमाल केली. कीकूने हा दावा केला आहे की त्याने रणवीरच्या लग्नात इटलीला 18 म्हशींचे पनीर पाठवले होते. 

 

शोमध्ये दिसणार 5 मजेदार कॅरेक्टर...
- कपिलच्या शोमध्ये पुन्हा एकदा कीकू शारदा, बच्चा यादवच्या आपल्या भूमिकेत परत आला आहे. पुन्हा एकदा तो आपल्या जोरदार जोक्सने प्रेकक्षकांना मनसोक्त हसवतो आहे. 
- भारती सिंह, बच्चा यादवची बायको आणि त्याच्या 11 मुलांची आई तितली यादवची भूमिका करत आहे. भारती आपल्या जबरदस्त कॉमेडीसोबत प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा भुरळ घालत आहे.  
- कृष्णा अभिषेक यावेळी एक किंवा दोन नाही तर चक्क तीन रोल निभावत आहे. आणि प्रत्येक रोलमध्ये तो कमाल-धमाल दिसतो आहे. 
- सुमोना चक्रवर्ती, तितली यादवच्या बहिणीच्या भूमिकेत आहे आणि ती आपल्या या अवतारात खूप मस्ती करणार आहे.  
- रॉशेल राव, सुंदर शेजारीणीची भूमिका करत आहे. अशी शेजारीण जिचे सर्वच फॅन आहेत आणि तिला सर्व परेशान करतात. 

 

बातम्या आणखी आहेत...