आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Kapil Sharma Show, Kapil Sharma Flirting Woman, The Kapil Sharma Show Crew Members Not Happy,TV News, Tv CELEB, TV Latest News

वादात अडकला कपिल शर्मा, सेटवर सर्वांसमोर मुलीला करत होता फ्लर्ट, शोचा प्रोड्यूसर सलमान खानपर्यंत गेली तक्रार 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. कपिल शर्मा सध्या आपला नवीन शो 'द कपिल शर्मा' मुळे चर्चेत आहे. त्याच्या शोला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. याच काळात एक वृत्त येत आहे, यामुळे कपिल शर्माच्या अडचणी वाढू शकतात. शोदरम्यान ऑडियन्समध्ये बसलेल्या एका मुलीला फ्लर्ट करणे कपिलला महागात पडले. कपिल मुलीला म्हणाला - 'जर तुझे वडील सोबत नसते तर मी तुझ्यासोबत अजून बोललो असतो.' रिपोर्ट्सनुसार कपिलच्या अशा वागण्यामुळे नाराज होऊन क्रू मेंबर्सने प्रोड्यूसर सलमान खानकडे तक्रार केली आहे. 


- क्रू मेंबर्सने सलमानची तक्रार करत म्हटले की, कपिलने स्क्रिप्टच्या माध्यमातून कुणालाही कमी लेखू नये आणि कुणावरही कमेंट करुन स्वतः अडचणीत येऊ नये. 
- कपिलचा मागचा सीजन 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा'ला ऑडियन्सने नाकारले होते. पण त्याचा नवी शो 'द कपिल शर्मा शो'ला खुप पसंती मिळत आहे. शोला चांगला टीआरपी मिळत आहे. 
- सूत्रांनुसार येणा-या एपिसोडमध्ये एमरान हाशमी, सनी लियोनी आणि अमृता राव शोमध्ये दिसणार आहेत. 

 

सलमानने केली होती कपिलची मदत 
कपिलचे पहिले दोन सीजन दोन प्रोडक्शन हाउसने प्रोड्यूस केले होते. यामध्ये कपिल शर्माचा प्रोडक्शन K9 प्रोडक्शन आणि फ्रेम प्रोडक्शन होते. फ्रेम्स प्रोडक्शनने गेल्या सीजनमध्ये झालेल्या इंसीडेंटनंतर एकत्र काम करण्यास नकार दिला होता. कपिलच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे प्रोड्यूसर आणि कपिलचे नाते खराब झाले होते. तर दूसरीकडे कपिलजवळ एकट्याने शो प्रोड्यूस करता यावा एवढा पैसा नव्हता. त्याने अनेक लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणालाच तयार करु शकला नाही. फायनली सलमानने कपिलचा सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला होता. कपिलचा शो सलमान प्रोड्यूस करत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...