आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनालीत तरुणीची निर्घृण हत्या, ओळख न पटण्यासाठी दगडाने ठेचला चेहरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाली(हिमाचल प्रदेश) - येथे एका तरुणीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ जोगिनी धबधब्याजवळ अस्ताव्यस्थ अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. आता भा.दं.वि कलम 302 अंतर्गत तपास सुरू केला आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी करण्यात येत आहे. 

 

अद्यापही पटली नाही ओळख 

माहितीनुसार रविवारी स्थानिक लोकांनी जोगिनी धबधब्याजवळ तरुणीचा मृतदेह असल्याची पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांच्या एक टीम घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. युवतीच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दगडाने ठेचून अस्ताव्यस्त करण्यात आल्याचे तपासात आढळून आले. यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले आहे. 

 

पर्यटकाचा मृतदेह असल्याचा पोलिसांना संशय
डीएसपी शेर सिंहचे म्हणणे आहे की, जोगनी धबधब्याजवळ युवतीचा मृतदेह आढळला असून त्याची ओळख पटली नाही. मृतदेहाकडे पाहून तरुणीचे वय 25 ते 30 वर्ष आहे. हा मृतदेह एखाद्या पर्यटकाचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस अधिक्षक कुल्लू शालिनी अग्निहोत्री यांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...