• Home
  • News
  • The King of Pop Michael Jackson is still alive in fans heart

Bollywood / आजदेखील चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन, त्यांच्या नावावर होते अरबो रुपयांची कमाई

डोक्यापासून पायांपर्यंत कर्जात बुडालेले होते मायकल

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 01:50:00 PM IST

हॉलिवूड डेस्क : मायकल जॅक्सनला जाऊन आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. किंग ऑफ पॉप म्हणवले जाणारे मायकल जॅक्सन फॅन्सला त्यावेळी धक्का लागला होता जेव्हा अचानक 25 जून 2009 मध्ये त्यांच्या मृयूची बातमी आली. त्यांच्या मृत्यूचे कारण हार्ट अटॅक होते. ते आपल्या लॉस एंजेलिसमधील घरात मृतावस्थेत सापडले होते.

26 अमेरिकन म्यूझिक अवार्ड्स...
मायकल एकटे असे गायक आहेत ज्यांला रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमने सम्मानित केले गेले होते. यामध्ये एकूण 26 अमेरिकन म्यूझिक अवार्ड्स मिळाले. मायकलचे फॅन्स आजही जगभरात पसरलेले आहेत. त्यांना आयुष्यात प्रसिद्धी तर खूप मिळावी. पण जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच त्यांची बदनामीही झाली.

मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा झाला आरोप...
कर्ज आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळे शेवटाच्यावेळी त्यांना खूप त्रास झाला. त्यावर 2005 मध्ये आपले दोन पुतण्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. मात्र त्यांच्यावर झालेले आरोप सिद्ध झाले नाही. जॅक्सन यांचे म्हणणे होते की, त्यांना लहान मुले खूप आवडतात आणि हे आरोप खोटे आहेत. त्यांच्याविरुद्ध हा खटला चार महिने चालला. मात्र नंतर त्यांना या प्रकरणात निर्दोष मुक्तता मिळाली.

डोक्यापासून पायांपर्यंत कर्जात बुडालेले होते मायकल...
जेव्हा मायकल जॅक्सन यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर खूप कर्ज होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने होणाऱ्या कमाईडावरे कुटुंबाने कर्ज फेडले. 2018 मध्ये त्यांच्या नावावर 28.40 अरबपेक्षा जास्त कमाई झाली होती. मृत्यूनंतर अल्बम आणि इतर डील्समुळे जॅक्सन यांच्या नावावर दरवर्षी अरबो रुपयांची कमाई होते. त्यांच्या कमाईमध्ये हॅलोवीन आणि स्क्रीम अल्बममुळे खूप फायदा होतो. फोर्ब्सच्या लिस्टमध्ये मायकल जॅक्सन मागच्या 5 वर्षांपासून टॉपवर बनलेले आहेत. 2018 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिवंगत सिंगर एल्विस प्रेस्ली होते.

फोर्ब्सनुसार, 25 जून 2009 मृत्यू झाल्यांनतर आतपर्यंत 9 वर्षांमध्ये मायकल जॅक्सनच्या नावावर 2.4 बिलियन डॉलर (17,110 कोटी रुपये) ची कमाई झाली.

X
COMMENT