आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपाय धुण्यास गेलेल्या कामगाराचा ताेल गेला; वाचवण्यास गेलेल्यासह दाेघे बुडाले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - येथील पांगरा तलावात दोन कामगारांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. मृत झालेले दोघे तालुक्यातील कसाबखेडा येथील रहिवासी असून कसाबखेडा गावावर व मृतांच्या नातेवाइकांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला. 


तालुक्यातील कसाबखेडा येथील शेख अजीम शेख अहेमद (४१), विकास भगवान किर्तीकर (२१) या दोघांसह अन्य कामगार शुक्रवारी ९ वाजेच्या सुमारास खुलताबाद येथे ट्रकमध्ये सिमेंटने भरलेल्या गोण्या खाली उतरवण्यासाठी आले होते. सिमेंटच्या गोण्या उतरवल्यानंतर कामगार विकास व शेख अजीम हे दोघेजण सिमेंटने भरलेले हात-पाय धुण्यासाठी जवळील पांगरा तलावात गेले होते. तलावात हातपाय धूत असताना विकास किर्तीकर याचा पाण्यात तोल गेला व तो खोल पाण्यात पडला. विकासला पोहता येत नसल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला. तो बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या शेख अजीमने विकासला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली व पोहून विकासला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. विकास हा बुडत होता. शेख अजीमने प्रयत्न करूनही विकास वाचू शकला नाही व शेख अजीमही विकास बरोबर पाण्यात बुडाला. दोघे बघता बघता पाण्यात बुडाले. तलाव परिसरात कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांना दोघे बुडत असल्याचे दिसताच अारडाअाेरड करत लोकांना माहिती दिली. परंतु वेळ जास्त झाली असल्याने दोघेजण वाचू शकले नाही. विकासला पोहता येत नव्हते. शेख अजीमला पोहता येत होते. विकासला वाचवण्यासाठी गेलेला अजीमही पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला. विकास किर्तीकर हा अविवाहित होता तर शेख अजीम हा विवाहित होता. शेख अजीमला दोन मुले, दोन मुली असून तो आई-वडिलांना एकुलता एक होता. एकाच गावातील दोघेजण रहिवासी असल्याने मृतांच्या नातेवाइकांवर  संकट कोसळले. 

बातम्या आणखी आहेत...