आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात बीचवर वसलेल्या शोयना गावात रेतीचे प्रमाण वाढल्याने जमीन खचली, लोक छतावर राहत आहेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को -‘रशियामध्ये व्हाइट सी’ (पांढरा समुद्र) बीचवर वसलेल्या शोयना गावात रेतीचे प्रमाण वाढल्याने घरे जमिनीत खचत चालली आहेत.  यामुळे अनेक नागरिक तळमजला सोडून दुसऱ्या मजल्यावर राहण्यास गेले. २० पेक्षा अधिक घरे रेतीमध्ये दबली गेली आहेत. या घरांमध्ये रेती इतक्या मोठ्या प्रमाणावर साचली आहे की, उपसण्यासाठी बुलडोझर मागवावे लागले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर हे गाव ‘मासे पकडण्याचे एक बंदर’ म्हणून विकसित झाले होते.

 

 जवळच्या शहरातून येथे येण्यासाठी लोकांना हेलिकॉप्टरचा वापर करावा लागतो. एव्हदोकिया सखारोव्हा (८१)या वृद्ध महिलेने सांगितले, हे गाव खूप हिरवेगार होते. येथे मासेमारी होत असे. पूर्वी ८०० लोक राहात हाेते, आता फक्त २८५ लोक राहतात. 

 

जवळच्या बाजाराचे अंतर १० तास

गावातील लाेक आजही समुद्रात मासेमारी करतात. जवळ असलेल्या मासळी बाजारात पोहोचण्यासाठी कमीत कमी १० तास लागतात. गावातील बाथहाऊसमध्ये महिला व पुरुषांचे  स्नान करण्याचे दिवस ठरलेले आहेत. मंगळवार-बुधवार महिला व गुरुवार-शुक्रवारी पुरुषांना स्नानासाठी ठेवण्यात आले. 

 

इको सिस्टिममुळे विपरीत परिणाम

सोव्हिएतच्या इतिहासानुसार, येथे मासेमार खूप मोठ्या संख्येने मासे पकडत होते. परंतु मासे जास्त असलेल्या भागात इको सिस्टिमचा परिणाम झाला आहे. मासे पकडण्याच्या जहाजाने समुद्राच्या तळातील शेवाळ नष्ट केले. यामुळे गावात रेतीचे प्रमाण वाढते आहे. 

बातम्या आणखी आहेत...