आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रांतवार बदलते मूकबधिरांची भाषा, आपणही शिका ही भाषा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोशनी शिंपी 

औरंगाबाद - खान्देशात अहिराणी, मराठवाड्यात मराठवाडी, उत्तर महाराष्ट्रात दखनी याप्रमाणे प्रांत बदलताच मराठी भाषा बदलते. लहेजा आणि शब्द वेगवेगळे आहेत. याचप्रमाणे मूकबधिरांची भाषादेखील प्रांतवार बदलते. सांकेतिक भाषा असली तरीही प्रांतानुसार संकेत बदलतात. जागतिक भाषेपेक्षा भारतीय भाषाही निराळी आहे. भारतात २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार १.३ दशलक्ष मूकबधिर होते.  ढोबळमानाने सांगायचे तर लोकसंख्येच्या १ टक्का लोक मूकबधिर आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची भाषा, किमान महत्त्वाचे संकेत सर्वसामान्यांना माहिती असणे गरजेचे आहे. आज, २६ सप्टेंबर जागतिक मूकबधिर दिनानिमित्त दिव्य मराठी आपल्या वाचकांना मूकबधिरांचे महत्त्वाचे संकेत सांगणार आहे.  यामुळे त्यांना समजावून घेणे सोपे होईल. संवाद साधणे शक्य होईल अन् गरजेच्या वेळी अचूक मदतही करता येईल. 

महाराष्ट्रात ९ लाख ४९ हजार मूकबधिर आहेत. राज्यात शासन चालवत असलेल्या मूकबधिरांच्या तीनच शाळा आहेत. औरंगाबाद, अकोला आणि रायगड या ठिकाणी या शाळा आहेत. मात्र, औरंगाबादेतील शाळा मागील २ वर्षांपासून बंद पडली आहे. तर शासन अनुदानावर चालणाऱ्या २६५ शाळा आहेत अन् पूर्णपणे खाजगी असलेल्या २४ शाळा चालवल्या जातात.  मूकबधिरांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण घेता येत नाही. इंग्रजीही त्यांना येणे कठीण असते. सांकेतिक भाषेचे प्रशिक्षकही कमीच आहेत.
 

एकाग्रता चांगली
औरंगाबादेतील प्रोग्रेसिव्ह लाइफ सेंटरच्या संचालिका आणि प्रशिक्षक कीर्ती डोंगरे यांनी सांगितले की, सर्वसामान्यांपेक्षा  एकाग्रतेचा गुण मूकबधिरांमध्ये अधिक आहे. संपूर्ण समाजाने त्यांची भाषा अवगत केली तर, त्यांचे जीवन सहज होईल. मूकबधिरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
 

मूकबधिरांची भाषा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...