आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात धोकादायक डिजीटल व्हायरसने भरलेल्या लॅपटॉप लिलावात 9 कोटी रूपयांमध्ये खरेदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन(अमेरिका)- येथील न्यूयॉर्कमध्ये नुकतेच एका लॅपटॉपचा लिलाव झाला. अतिशय सामान्य दिसणारा हा लॅपटॉप काही साधारण डिव्हाइस नसून त्यामध्ये संपुर्ण जगाचे सुमारे 6.64 लाख कोटींची नुकसान करणारे धोकादायक डिजिटल व्हायरस भरलेले आहेत. एवढेच नाही, तर या लॅपटॉपमध्ये असे व्हारस आहेत, ज्यामुळे 74 देशातील कंप्यूटर खराब झाले आहेत. त्यामुळे लिलावात या लॅपटॉपला तब्बल 10 लाख पाउंड (सुमारे 9 कोटी रूपये) मध्ये खरेदी करण्यात आले.

 

ज्या व्हायरसमुळे हा लॅपटॉप जगाभरात लोकप्रिय झाला, त्यामध्ये वॉना क्राय रॅनसमवेअर व्हायरसचा समावेश आहे. याच वॉना क्राय व्हायरसमुळे 2017 मध्ये यूके येथील नॅशनल हेल्थ सर्विस (आरोग्य सेवा) पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच या डिव्हाइसमध्ये आय लव्ह यू, माय डूम, डार्क तकीला, सो बिग आणि ब्लॅक एनर्जी यासारख्या व्हायरसचा समावेश आहे. 


व्हॅक्यूममध्ये ठेवले जाते लॅपटॉप 
हे लॅपटॉप एवढे धोकादायक आहे की, याला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि केबल्सपासून वेगळे एका वॅक्यूममध्ये ठेवले जाते. व्हायरस लॅपटॉपमधून बाहेर येऊ नये यासाठी याचे इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटी पोर्ट्स (यूएसबी आणि नेटवर्क सॉकेट) सुद्धा बंद ठेवले जातात, कारण.

 

आर्ट-पीस म्हणून खरेदी केले लॅपटॉप 
लॅपटॉप खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, लिलावात या डिव्हाइसची बोली एक कलेची वस्तू म्हणून लावण्यात येत होती. म्हणजे, लॅपटॉपमध्ये व्हायरस इंस्टॉल करणाऱ्या गुओ आणि डॉन्गला या डिव्हाइसला एक व्हारसने भरलेला आर्ट पीसच म्हणूनच सादर करायचे होते. त्यामुळे त्यांनी याचे नाव परसिस्टेंस ऑफ केओस म्हणजे 'गडबडीची खात्री' असे ठेवले होते.


सॅमसंगचे मॉडल असलेला हा लॅपटॉप विंडोज एक्सपीच्या एसपी 3 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. याचे वैशिष्टय म्हणजे, यासाठी एक वेबसाइट आहे, जी लॅपटॉपला 24 तास सतत ब्रॉडकास्ट करते.