आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवशी प्रसारित होतोय KBC 11 चा शेवटचा एपिसोड, यंदाच्या पर्वाला एक दोन नव्हे मिळाले चार करोडपती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. आज म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नेहमीप्रमाणेच यंदाच्या पर्वातही केबीसीच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.  या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात लेखिका, शिक्षण आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष असलेल्या पद्मश्री सुधा मूर्ती यांची उपस्थिती राहणार आहे.  हा शेवटचा भाग कर्मवीर एपिसोड असणार असून सोनी टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेवटच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये बिग बी सुधा मूर्ती यांच्या पाया पडताना दिसत आहेत.

बिग बींनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचा प्रोमो शेअर करुन सर्वांना धन्यवाद दिले आहेत. केबीसीचे 11 वे पर्व एकुण 13 आठवडे चालले. 

  • यंदाच्या पर्वात एक दोन नव्हे तर चार करोडपती...

‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या पर्वात चार जण कोट्यधीश झाले. सनोज राज, बबिता तावडे, गौतम कुमार झा आणि अजीत कुमार हे स्पर्धक केबीच्या 11 व्या पर्वाचे चे करोडपती ठरले होते. या सर्व स्पर्धकांच्या आठवणींना उजाळा देत सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे केबीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पर्वात एवढे स्पर्धक करोडपती ठरले.