आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार 16 जुलैला चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतामध्ये दिसेल. आषाढ मासातील पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेला चंद्रग्रहण होत आहे. भारतासोबतच हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिकेत दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 16 जुलैला रात्री 1 वाजून 31 मिनिटांनी ग्रहण सुरु होईल. ग्रहणाचा मोक्ष 17 जुलैला पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी होईल. वर्ष 2019 मधील हे शेवटचे चंद्रग्रहण आहे.
केव्हा सुरु होणार सुतक काळ
चंद्रग्रहणाचे सुतक ग्रहण सुरु होण्याच्या 9 तासांपूर्वी सुरु होते. चंद्रग्रहणाचा सुतक काळ दुपारी 4.30 पासून सुरु होईल, जो 17 जुलैला सकाळी 4.30 पर्यंत राहील.
सुतक काळापूर्वी करावे पूजन कर्म
16 जुलैला गुरुपौर्णिमा असल्यामुळे या दिवशी विशेष पूजा-पाठ करण्याची आवश्यकता आहे. या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करावी. या दिवशी पूजन कर्म दुपारी 4.30 पूर्वीच करावे. त्यानंतर सुतक काळ सुरु होत असल्यामुळे पूजन कर्म होत नाही.
ग्रहण काळात ग्रहांची स्थिती
शनी आणि केतू ग्रहण काळात चंद्रासोबत धनु राशीमध्ये राहतील. यामुळे ग्रहणाचा प्रभाव जास्त वाढेल. सूर्यासोबत राहू आणि शुक्र राहतील. सूर्य आणि चंद्र चार विरुद्ध ग्रह शुक्र, शनी, राहू आणि केतूमध्ये राहतील. मंगळ नीचेचा राहील. या ग्रह योगांमुळे तणाव वाढू शकतो. भूकंपाचा धोका राहील. पूर, वादळ यासारखे नैसर्गिक संकट येऊ शकते, नुकसान होण्याचे योग जुळून येत आहेत.
149 वर्षांनंतर दुर्लभ योग
12 जुलै, 1870 म्हणजे 149 वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेला चंद्रग्रहण झाले होते. त्यावेळीसुद्धा शनी, केतू आणि चंद्र धनु राशीमध्ये स्थित होते. सूर्य राहुसोबत मिथुन राशीमध्ये स्थित होता.
केव्हा होते चंद्रग्रहण?
विज्ञानानुसार, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते. या दरम्यान सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, ज्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्र दिसत नाही. या स्थितीला चंद्रग्रहण म्हणतात.
ग्रहणाची धार्मिक मान्यता काय आहे?
ग्रहणासंदर्भात धार्मिक मान्यता विज्ञानापेक्षा खूप वेगळी आहे. शास्त्रानुसार, प्राचीनकाळी समुद्र मंथनातून अमृत निघाले होते. या अमृताचे सेवन भगवान विष्णू मोहिनी रूपात सर्वांना करत होते. या दरम्यान राक्षस राहूने देवतांचे रूप धारण करून अमृतपान केले. सूर्यदेव आणि चंद्रदेवाने हे ओळखले आणि भगवान विष्णूंना सांगितले. यामुळे श्रीविष्णू यांनी सुदर्शन चक्राने राहूचे शीर धडापासून वेळगे केले. तेव्हापासून राहू सूर्य आणि चंद्राला ग्रासतो म्हणजे गिळून घेतो. जेव्हा-जेव्हा सूर्य किंवा चंद्राला राहू ग्रासतो तेव्हा ग्रहण होते.
ग्रहण काळात काय करावे
ग्रहण काळात एखाद्या शांत ठिकाणी बसून मनातल्या मनात कुलदेवतेच्या मंत्रांचा जप करावा. ग्रहणानंतर एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे. सामर्थ्यानुसार दान करावे.
सर्व 12 राशींवर कसा राहील चंद्रग्रहणाचा प्रभाव
मेष - चांगला, वृषभ - कष्ट, मिथुन - दुःख, कर्क - उत्तम, सिंह - तणाव, कन्या - चिंता, तूळ- लाभ, वृश्चिक - सावधानी, धनु - सतर्क राहावे, मकर - धोका, कुंभ - प्रगती, मीन - यात्रा आणि लाभ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.