आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलडीएफ सरकार भाजपच्या दयेने स्थापन झालेले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम -  अय्यप्पा भक्तांच्या अटकेवरून केरळ सरकारला उखडून फेकून देण्याची धमकी दिल्यावरून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. विजयन यांनी रविवारी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, आमचे सरकार भाजपच्या दयेवर नव्हे, तर जनतेच्या पाठिंब्याने सत्तेत आले आहे.  


सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे समर्थन केले असल्यानेच भाजपचे अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवड झालेल्या सरकारला इशारा देत आहेत, अशी टीका करून विजयन म्हणाले की,  न्यायालयाने सबरीमाला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात प्रत्येक वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. अमित शहा यांनी केलेली टिप्पणी सर्वोच्च न्यायालय, राज्यघटना आणि आपल्या न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही या वक्तव्यावरून अमित शहांच्या विरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. दुसरीकडे, केरळ भाजपचे अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले की, सबरीमाला मंदिरात प्रत्येक वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास आमच्या पक्षाचा विरोध आहे. यापुढेही मंदिर उघडल्यानंतर भाजप भक्तांच्या पाठीशी उभा राहील.  

 

विरोधात झालेल्या निदर्शनांतील ३३४५ पेक्षा जास्त अटकेत 
सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या विरोधात झालेल्या निदर्शनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३३४५ पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. रविवारी सकाळी सबरीमाला तांत्री कुटुंबाचे सदस्य आणि अय्यप्पा धर्म सेनेचे अध्यक्ष राहुल ईश्वर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोची येथील फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले. ईश्वर यांनी गेल्या आठवड्यात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, जर बंदी असलेल्या वयोगटातील कोणत्याही महिलेने मंदिरात प्रवेश केला तर मी मंदिर परिसरात रक्ताचे पाट वाहून ते बंद करेन.  

 

बातम्या आणखी आहेत...