आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा शपथविधी : शपथविधी सोहळ्यास ६ शेजारी देशांचे नेते येणार, पाककडे दुर्लक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३० मे रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास सहा शेजारी देशांचे नेते सहभागी होतील. बिम्स्टेकमधील बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांच्याशिवाय किर्गिस्तान आणि मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रणे देण्यात आली आहेत. पाकिस्तानला शपथविधीपासून दूर ठेवण्यासाठी सार्कमधील नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. मोदी यांनी २०१४ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह सार्कमधील सर्व नेत्यांना आमंत्रित केले होते. या वेळी आमंत्रणावरूनच स्पष्ट संकेत देण्यात आला आहे की, दुसऱ्या कार्यकाळात सरकार पाकपासून अंतर ठेवून राहील. सूत्रांनी सांगितले की, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जेव्हा फोनवरून मोदी यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्या वेळी भारताकडून त्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते, तसेच त्यांनीही येथे येण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. अमेरिका, जपान आणि चीनसारख्या मोठ्या देशांच्या नेते येतील असे सांगण्यात येत होते. सूत्रांनी सांगितले की, इस्रायलचे राष्ट्रपती बेंजामिन नेतन्याहू सोहळ्यास येण्याची शक्यता होती, मात्र त्यांच्यासह अरब जगतातील नेत्यांनाही आमंत्रण द्यावे लागत होते. 

 

बंगालच्या उपसागरालगतच्या सात देशांची संघटना आहे बिम्स्टेक

नेबरहुड फर्स्ट धोरणाला चालना
> पाकिस्तान वगळून ६ शेजारी देशांच्या नेत्यांना शेजारधर्माला प्राधान्य धोरणांतर्गत आमंत्रणे देण्यात आली आहेत.  बंगालच्या उपसागरापासून दूर असलेल्या पाकिस्तानला १९९७ मध्ये स्थापन या गटातून बाहेर ठेवण्यात आले आहे. 
> मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्ननाथ हे यंदाच्या प्रवासी भारतीय दिनाला प्रमुख पाहुणे होते, म्हणून त्याना आमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
> १४ ते १५ जून रोजी होणाऱ्या शांघाय सहकारी संघटनेचे यजमानपद किर्गिस्तानकडे आहे. त्यास मोदी जाणार आहेत. त्यामुळे त्यांना आमंत्रण आहे. 
> मोदी मालदीवचा पहिला विदेश दौरा करणार आहेत. त्यामुळे तेथील राष्ट्रपतींना आमंत्रण नाही. मॉरिशस आणि मालदीव अरबी समुद्रातील नौदल धाेरणामुळे महत्त्वाचे आहेत. 
 

 

मुत्सद्देगिरी : सार्कला पर्याय म्हणून तीन वर्षांपासून भारताकडून बिम्स्टेकला महत्त्व
बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन अर्थात बिम्स्टेकमध्ये दक्षिण आणि आग्नेय आशियातील ते सात देश आहेत, जे बंगालच्या उपसागरालगत आहेत. यात भारताशिवाय बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश आहे.सार्कला पर्याय म्हणून तीन वर्षांपासून भारताकडून बिम्स्टेकला महत्त्व देत आहे. 

 

शेख हसीना या वेळी सोहळ्यास येणार नाहीत 
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २०१४ प्रमाणे या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास येऊ शकणार नाहीत. त्या जपान, सौदी अरेबिया आणि फिनलंडच्या दौऱ्यावर असतील. हसीना यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री एकेएम मुजम्मल हक येतील. 


> राजकारणात आलेले रजनीकांत आणि कमल हसन यांनाही आंमत्रण देण्यात आले आहे.