आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने बोलले असे काही शब्द; परत आली मृत पत्नी! तिला दरवाजात पाहुन सगळेच झाले बेहाल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- मृत्यूनंतर सरणावरुन अचानक जिवंत झालेल्या व्यक्तींबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असतील. परंतु आम्ही ज्या घटनेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत त्यावर तुम्हाला विश्वास बसणे थोडे अवघड जाईल. 1705 मध्ये आयर्लंड बेटावर मार्गोरी मॅककॉल नावाची एक महिला अचानक जिवंत झाली होती. तापामुळे मार्गोरीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिचा ताप लोकांमध्ये पसरु लागल्याने मार्गोरीला दफन करण्यात आले होते. असे मानतात की, त्यानंतर लुट करणाऱ्या एका टोळीने मार्गोरीच्या शरीरावरील सोने चोरण्यासाठी तिची कबर खोदली होती.

 

अचानक कबरेतुन उठून बसली मार्गोरी
त्यानंतर अचानक मार्गोरी तिच्या कबरेतुन उठुन बसली. तिला पाहुन चोर तिथुन पळाले. त्यानंतर मार्गोरी कबरेतुन उठून तिच्या घरी गेली. घरी व्यवसायाने डॉक्टर असलेले तिचे पती आणि तिची मुले होती. मार्गोरीने तिच्या घराचा दरवाजा वाजवल्यानंतर तिच्या पतीने दरवाजा उघडला. तेव्हा दरवाजाबाहेर त्याची पत्नी मार्गोरी उभी होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मार्गोरीचा मृत्यू झाल्यानंतर ज्या कपड्यांमध्ये तिला दफन केले होते त्याच  कपड्यांमध्ये ती दरवाजासमोर उभी होती. तिच्या हाताच्या बोटांमधुन रक्त सांडत होते. तिला मार्गोरीला या अवस्थेत पाहुन तिचा पती तिथेच जमिनीवर कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यालाच त्या कबरेत दफन करण्यात आले जिथे मार्गोरीला दफन केले होते.

 

...परत आल्यानंतर अनेक वर्षे जिवंत राहीली मार्गोरी

पतीच्या मृत्यूनंतर मार्गोरीने दुसरे लग्न केले. त्यानंतर अनेक वर्षांनी तिचा मृत्यू झाला. परंतु या घटनेनंतर अनेक वर्षे याविषयी चर्चा होत राहीली. मार्गोरीच्या या घटनेवर अनेक लोकांना विश्वास होत नाही आणि अनेक लोकांना ही घटना खरी वाटते.    

 

बातम्या आणखी आहेत...