आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांच्या आयुष्यात मिळालेले धडेच पुढे स्वातंत्र्य युद्धात शस्त्रे बनली!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीजींचा मोहनपासून महात्मा बनण्याचा प्रवास लहानपणीच सुरू झाला होता. १६ व्या वर्षापर्यंतच त्यांनी आयुष्यातील तीन मोठे धडे घेतले होते. यात तीन शब्दातच त्यांच्या आयुष्याचे सार दडलेले आहे. स्वातंत्र्य युद्धही याच तीन तत्त्वांवर लढले गेले.

अहिंसा - विडी पिण्यासाठी चोरी केली, वडिलांसमोर कबुली
लहानपणी गांधीजींना विडीचे व्यसन लागले. त्यासाठी ते कधी पैसेही चोरत असत. धोतऱ्याच्या बिया खाऊन आत्महत्येचाही विचार केला. पण जास्त बिया खाण्याची हिंमत झाली नाही.
- वडिलांना पत्र लिहून कबुली दिली. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. यातून अहिंसेची शिकवण मिळाली.

सत्य - हरिश्चंद्र नाटक पाहून खूप रडले, स्वप्नातही हरिश्चंद्र येत
गावात हरिश्चंद्र नाटक पाहून गांधीजी प्रभावित झाले. मनात हे नाटक शेकडो वेळा अनुभवले. हरिश्चंद्राचेच स्वप्न पडत. त्यांच्यासारखे सत्यवादी सगळेच नाही बनत, हा प्रश्न सतावत असे.
- हरिश्चंद्र नाटक पाहून गांधीजी खूप रडले. त्यांच्या विचारांमध्ये ते सत्यवादी विचार नेहमी जिवंत राहिले.

सविनय अवज्ञा - पत्नी कस्तुरबाने दिली पहिली शिकवण
गांधीजींनी कस्तुरबांना परवानगीशिवाय बाहेर न जाण्याचा आदेश दिला होता. पहिल्या दिवशी कस्तुरबांनी त्याचे पालन केले. पण दुसऱ्या दिवशी बाजारात गेल्या. नाराज गांधीजींनी कारण विचारले.

कस्तुरबा म्हणाल्या- पतीचे ऐकते म्हणून आईला सांगते. अशा प्रकारे त्यांनी सविनय कायदेभंग शिकवला.
 

बातम्या आणखी आहेत...