आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Library Was Shifting 1700 Feet Away, 650 People Made Human Chain And Delivered Books

लायब्ररी 1700 फूट दूर शिफ्ट होत होती, 650 लोकांनी मानवी साखळी बनवून पुस्तके पोहोचवली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओक्लाहोमा सिटी : अमेरिकेच्या ओक्लाहोमा सिटीच्या नॉर्मनमध्ये 30 वर्षे जुनी असलेली पब्लिक सेंट्रल लायब्ररी 1700 फूट दूर नव्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट होणार होती. पण कामगार  न मिळाल्यामुळे याला वेळ लागत होता. अशात 650 लोकांनी रविवारी एन्ड्रू पार्कजवळ मानवी साखळी बनवून दोन तासांत 5000 पुस्तके लायब्ररीमध्ये पोहोचली. 


मानवी साखळीमध्ये छोटी मुले सुपरहीरोच्या वेशभूषेमध्ये दिसली. एवढेचय नाही तर नॉर्मन शहराच्या मेयर ब्रेया क्लार्कदेखील आठ मिनिटे या ह्यूमन चेनचा भाग झाल्या होत्या. ज्यामुळे पुस्तके योग्य ठिकाणी सुरक्षित पोहोचू शकली. नव्या पब्लिक लायब्ररी सेंट्रलचे उद्घाटन तीन नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता होईल. 

8 वर्षांच्या मुलापासून तर 54 वर्षांचे वयस्कर व्यक्तीही झाले सहभागी...  
मानवी साखळीमध्ये 8 वर्षांच्या मुलापासून तर 54 वर्षांचे वयस्कर व्यक्तीही सहभागी झाले होते. लायब्ररीचे प्रवक्ता कीथ मर्कक्स म्हणाले - "नॉर्मनची लोकसंख्या 1.23 लाख आहे. येथे जास्तीत जास्त तरुण आणि लहान मुले आहेत. ते दररोज येथे वाचनासाठी येत असतात. पण लायब्ररी बदलल्यामुळे त्यांच्या वाचनावर परिणाम होत होता. जसे त्यांच्या नातेवाईक आणि स्थानिक लोकांना याबद्दल कळाले तेव्हा ते पुढे आले आणि पुस्तके शिफ्ट करण्यासाठी मदत केली."
 

बातम्या आणखी आहेत...