Home | International | Other Country | The longest and dangerous submarine made by Russia

एकच प्रहार करून शहर उद्ध्वस्त करू शकणारी महासंहारक पाणबुडी, हिरोशिमावरील बाँबपेक्षा १३० पट जास्त घातक स्फोटकांनी सज्ज

वृत्तसंस्था | Update - Apr 26, 2019, 11:13 AM IST

६०४ फूट लांब पाणबुडीत टॉरपिडो, कमांडर थेट राष्ट्रपतींना रिपोर्ट करतील

  • The longest and dangerous submarine made by Russia

    मॉस्को - उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन - व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीपूर्वी रशियाने आपली लष्करी बळात प्रचंड वाढ केली. रशियाने जगातील सर्वात मोठी पाणबुडी बेलगोरोडला आपल्या नौदलाच्या शस्त्रागारात सामील केले. ६०४ फूट लांबीच्या बेलगोरोडमध्ये ६ अण्वस्त्रसज्ज टॉरपिडो आहेत. त्यावरून पाणबुडीच्या संहारक क्षमतेचा अंदाज येऊ शकेल. हे टॉरपिडो २ मेटाटन स्फोटके सोबत वाहून नेऊ शकतात. २ मेटाटन स्फोटकांची क्षमता जपानच्या हिरोशिमामध्ये झालेल्या स्फोटाच्या १३० पट जास्त असते. पाणबुडीने एक प्रहार केल्यास संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊ शकते. पाणबुडीमध्ये लावण्यात आलेले ७९ फूट लांब टॉरपिडो पोसेइडोन किंवा कॅनयोगचा समुद्रात वापर झाल्यास रेडिआेअॅक्टिव्ह सुनामी येऊ शकते. हीच रेडिआेअॅक्टिव्ह सुनामीच समुद्र किनाऱ्यावरील शहरांना नष्ट करू शकते आणि ३०० फुटांपर्यंतचा अजस्र लाटा येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बेलगोरोड पाणबुडीचा वेग ताशी ८० मैल आहे. त्यावरील कमांडर थेट राष्ट्रपतींना रिपोर्ट करतील. ही पाणबुडी अंडरवॉटर एजन्सीसारखी रशियासाठी हेरगिरी करेल. त्याचबरोबर सागरी तेलसाठ्याचा शोध घेण्यासाठीदेखील पाणबुडीचा उपयोग केला जाणार आहे.

    चाचणी पुढील वर्षी
    रशियाच्या बेलगोरोड पाणबुडीची लष्करी चाचणी पुढील वर्षी सुरु होईल व ते २०२१ मध्ये तैनात होईल.

Trending