आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी इतिहासातील सर्वात लांब उडी, मोहिमेशी ४ लाख जण जोडले होते, महिला गणितज्ञांनी चंद्रापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा आराखडा रेखाटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क  - २० जुलै १९६९. याच दिवशी अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. नील यांनी चंद्रावर यान उतरवले तेव्हा ते मानवी इतिहासातील सर्वात लांब उडी ठरली होती. त्या यानात नील यांच्यासह एल्ड्रिन ही होते. नील यांच्यानंतर त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. चंद्रावर चालताना नील यांचे उद्गार असे होते- हे मानवाचे लहानसे पाऊल आहे, पण मानवतेची लांब उडी आहे. त्यानंतर एल्ड्रिन म्हणाले, शानदार कामगिरी.  अपोलो च्या एकूण ११ मोहिमांत ३३ अंतराळवीर अवकाशात गेले होते. त्यापैकी २७ चंद्रावर पोहोचले होते. २४ जणांनी चंद्राची परिक्रमा केली. परंतु १२ अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चालण्याची संधी मिळाली. 
 

४ लाख जोडलेले, ५३ कोटी लोकांनी थेट पाहिले 
नासाच्या म्हणण्यानुसार अपोलो मोहिमेशी सुमारे ४ लाख लोक जोडलेले होते. त्यात चंद्रावर जाणारे अंतराळवीरापासून मिशन कन्ट्रोलर, कंत्राटदार, कॅटरर, अभियंता, वैज्ञानिक, नर्स, डॉक्टर, गणितज्ञ, प्रोग्रामर यांचा समावेश होता. सुमारे ५३ कोटी लोकांनी या घटनेला थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिले होते. ही तेव्हाची १५ टक्के लोकसंख्या होती. 
 

सर्व अंतराळवीर वय, धर्म, प्रशिक्षणाद्वारे एकरूप
नील आर्मस्ट्राँग यांची निवड झाली नव्हती. अपोलो-११ अपयशस्वी ठरले असते तर अपोलो-१२ चे कमांडर पीट कोनराड यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो संग्रहालयाचे संरक्षक टीजेल म्यूर हर्मोनी म्हणाले, अपोलो मिशनचे सर्व अंतराळवीर १९३० मध्ये जन्मलेले होते. सर्वांना लष्करी प्रशिक्षण दिले होते. सर्वजण वैमानिक होते. सर्वच्या सर्व गोरे ख्रिश्चन होते. 
 

चंद्रभेटीनंतर सर्वांचेच आयुष्य बदलून गेले.. 
चंद्रावर १२ लोकांनी पाऊल ठेवले होते. जवळपास सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला. बजट एल्ड्रिन नैराश्यात गेले होते. चंद्रावर चालणाऱ्यांपैकी ड्यूक यांच्या कुटुंबाला त्यांच्याशी नंतर खूप जुळवून घ्यावे लागले. विवाह मोडण्यापर्यंत वेळ आली होती. जीनी सर्नन यांचा विवाह मोडला. एलन बीन कलाकार बनले व एड मिशेल गूढवादी बनले.