आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त बँक अधिकाऱ्यास एजंटांनी घातला ७८ लाखांना गंडा; विमा पॉलिसीवर ११०% व्याज देण्याचे दिले आमिष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - खासगी विमा कंपनीच्या पाॅलिसीवर  तब्बल ११० टक्के व्याज देत भरलेल्या रकमेवर बोनस आणि रक्कम परत देण्याचे आमिष देत  सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल ७८ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात रिलायन्स विमा कंपनीच्या चार ते पाच एजंटच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि  सेवा निवृत्त बँक अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. 

 

२०११-१२ मध्ये त्यांनी रिलायन्स विमा कंपनीची पॉलिसी काढली आहे. संशयित  कंपनीच्या प्रतिनिधी राज मित्तल, आर.के. टंडन,  नचिता मेहरा, रजत दीक्षित, राकेश शर्मा  व विमा कंपनी मधील त्यांचे सहकाऱ्यांनी वेळोवेळी फोन करत  काढलेल्या विमा पॉलिसीवर ११० टक्के व्याज आणि बोनस देण्याचे आमिष दिले.  कंपनीची नविन योजना असून सहा महिन्यात गुंतवणूक केली तर  रकमेवर ही योजना लागू असल्याचे सांगीतले.  सहा महिन्यात ११० टक्के व्याज मिळत असल्याने  तक्रारदार सोबत  अनेकांनी विमा कंपनीमध्ये तब्बल ७८ लाखांची रक्कम गुंतवणूक केली. या विमा पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता  कंपनीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे तूर्त ही योजना काही कालावधीसाठी बंद करण्यात असल्याचे संशयितांनी सांगितले.  संशयितांशी संपर्क केला असता फोन बंद असल्याचे समजले.  मुंबईस्थित कंपनीमध्ये प्रत्यक्ष खात्री केली असता अशा प्रकारची कोणत्याही विमा कंपनीची योजना नसल्याचे समजले. 

बातम्या आणखी आहेत...