Home | Divya Marathi Special | The Mahabharata - 2019, is the way the wind turns in itself

महाभारत - 2019 जिकडे वारे तिकडेच वळतात सारे

दिव्य मराठी | Update - Nov 12, 2018, 07:54 AM IST

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांची ५२ विनोदी भागांची वर्षभर चालणारी मालिका

 • The Mahabharata - 2019, is the way the wind turns in itself

  हाजी पंडित यांचे वागणे आज काहीसे वेगळे वाटत होते. अचानक ते सोफ्यावर चढले आणि भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरच्या समोर जाऊन थांबले. तेथून बाजूला सरकले तेव्हा कॅलेंडरवरील ८ नोव्हेंबर ही तारीख गायब होती. कॅलेंडरवरील ८ तारीख असलेली जागा कापण्यासाठी त्यांनी कात्री घरूनच आणली होती. काम झाल्यानंतर कापलेला कागदाचा तुकडा माझ्या हातात देऊन त्यांनी कात्री खिशात घातली. मला काही कळत नव्हते. आश्चर्याने मी त्यांच्याकडे पाहिले. काही विचारण्याआधीच ते म्हणाले, “८ नोव्हेंबरची तारीख कापली जाणे ठरलेले होते. मागील वर्षी त्यांनी कापली होती. या वर्षी दुसऱ्या भामट्यांनी कापली. दरवर्षी ही परंपरा कायम असल्याने मीही कॅलेंडरवरील ही तारीख कापून टाकली. दोन वेळा मोठमोठ्या लोकांनी ही तारीख कापली, आता आमच्यासारख्या साधारण व्यक्तीने केली तर बिघडले कुठे?’ हाजींचे बोलणे ऐकून मला हसू आवरले नाही. मी म्हणालो, “तुम्ही बरोबर म्हणत आहात.

  या तारखेची स्वत:च्या कुंडलीत गडबड आहे. पण ८ नोव्हेंबरची तारीख तर तुम्ही कापली, पण त्याच्या खाली ६ नोव्हेंबर तारीख दिसत आहे. तोपर्यंत ज्याचे तिकीट कापले जायला हवे त्याचे नक्की कापले जाईल. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारही आता थांबला आहे.’ हाजी अचानक बाबाच्या भूमिकेत गेले, “तुमचे म्हणणे योग्य आहे महाकवी! त्या दिवशी तर वादळापूर्वीची शांतता असणार आहे. ११ डिसेंबरला तर वादळच येईल.

  तसे पाहिले तर राजकारणात काही वादळ वगैरे काही नसते. नेहमी एकाचीच हवा असते आणि दुसऱ्यांची हवा उडून जाते.’ बालिश वक्तव्य करून हाजी स्वत:च जोरजोरात हसू लागले. मी विचारले, “हाजी राजस्थानात उंट उलटा बसलाय वाटतं. पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काय होईल?’ हाजी म्हणाले, “प्रिय शायर मित्र, इशारे तर केवळ प्रेमात होत असतात. निवडणुकीत तर कल सांगितला जातो. आता कुठे पत्त्यांचा डाव मांडण्यात आला आहे. खेळ तर सुरू होऊ द्या. तुम्ही तर आतापासूनच अस्वस्थ झालात महाकवी! थोडी प्रतीक्षा करा.

  चित्रपटाच्या भाषेत बोलायचे झाले तर “कहानी अभी बाकी है मेरे दोस्त...’ हाजींनी दिलेले ज्ञान पाहता येणाऱ्या काळात मोठी उलथापालथ होणार असल्याचे हाजींच्या लक्षात आल्याचे मला समजले. मी म्हणालो, “आज सावधगिरीने मत व्यक्त करत आहात हाजी, इतका विचार करून बोलत असाल तर टीव्हीवर एक्स्पर्ट पॅनलमध्ये जाण्याची संधी तुम्हाला कशी मिळणार?’ हाजींनी प्रस्ताव धुडकावून लावला अन् म्हणाले, “आग लागो त्या एक्स्पर्ट पॅनलला. टीव्हीवरच यायचे असेल तर तुमच्या कार्यक्रमात येणार नाही का मी? कुटुंबामुळे राजकारण धुळीस मिळत आहे आणि राजकारणामुळे कुटुंबाला नुकसान होत आहे. उद्या कुठली चिमणी कोणत्या फांदीवर बसेल याबद्दल सांगता येणार नाही. मेहबूब शायर निदा फाजली साहेबांचा एक शेर तर आठवणीत असेल तुमच्या....

  ‘अपनी मर्ज़ी से कहां
  अपने सफ़र के हम हैं
  रुख़ हवाओं का जिधर
  का है उधर के हम हैं’

Trending