आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To A Dispute During The Vehicle Checking, The Man Beat The Police Constable And Daroga In Moradabad, Up

वाहन चेकिंगदरम्यान सुरू झाला वाद... चिडलेल्या तरुणाने भरचौकात पोलिसांना त्यांच्याच दांडक्याने केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) - शनिवारी संध्याकाळी वाहन चेकिंगदरम्यान मारहाण झाली. एका पोलिस शिपायाने चेकिंगसाठी बाइक रोखल्याने चिडलेल्या तरुणाने मारहाण सुरू केली. बचावासाठी आलेल्या फौजदारालाही युवकाने बदडले. सध्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

 

जिल्ह्याच्या मझोला परिसरातील चौकात फौजदार धर्मेंद्र सोलंकी आणि शिपाई प्रेमपाल वाहनांची चेकिंग करत होते. तेवढ्यात शिपायाने एका बाइकस्वाराला रोखले. तो शिपायाशी हुज्जत घालू लागला. शिपायाने जेव्हा तरुणाच्या गाडीची किल्ली काढली तेव्हा दोघांमध्ये वाद आणखी वाढला. शिपायाला वाचवण्यासाठी आलेल्या फौजदारानेही तरुणाला बेदम मारहाण केली. मग त्याने शिपायाच्या हातून दांडके हिसकावून दोघांची धुलाई सुरू केली. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखपत झाली आहे.


पोलिसांना मारहाण सुरू असल्याचे पाहून एकाने याचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये शूट करून तो व्हायरल केला. सध्या पोलिसांनी दोन आरोपी तरुणांना अटक करून गजाआड केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...