Experiment / माणूस, माकडाच्या आनुवांशिक गुणसूत्रांपासून तयार केला जगातील पहिला डिझायनर भ्रूण

स्पेनच्या शास्त्रज्ञांचा चीनच्या लॅबमध्ये अनोखा प्रयोग, याआधी २०१७ मध्ये झाला होता असा प्रयोग
 

वृत्तसंस्था

Aug 05,2019 09:54:00 AM IST

माद्रिद / बीजिंग - स्पेनच्या शास्त्रज्ञाने चीनच्या प्रयोगशाळेत प्रथमच एक डिझायनर भ्रूण तयार केला आहे. तो माणूस आणि माकडाच्या गुणसूत्रापासून तयार केला आहे. हायब्रीड भ्रूणापासून तयार होणाऱ्या मुलांमध्ये दोघांचीही वैशिष्ट्ये असतील. कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्यासाठी हा प्रयोग चीनमध्ये करण्यात आला. या भ्रूणाचा १४ दिवस विकास झाल्यानंतर बंदी आणली होती. हा निर्णय माणसात प्राण्यांचे अवयव प्रत्यारोपित करण्यासाठी महत्वाचे मानले जात आहे. स्पॅनिश संशोधक जुआन कार्लोस यांनी अानुवांशिक बदलातील माकडाच्या भ्रूणामध्ये अवयवांचा विकास करणारी गुणसूत्रे निकामी केली होती. यानंतर माणसाच्या स्टेम पेशी टाकल्या. यानंतर तो गर्भ तयार होण्यास सक्षम झाला.

याआधी २०१७ मध्ये झाला होता असा प्रयोग

संशोधक जुआन कार्लोस यांनी २०१७ मध्ये प्रथमच माणूस आणि डुकराचे अनुवांशिक गुणसूत्रे वापरून असा एक भ्रूण तयार केला होता. परंतु हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. संशोधनाचा प्रकल्प काॅलाब्रेटर व अमेरिकी मर्सिया कॅथेलिक विद्यापीठाचे कुलगुरू अॅस्ट्रेला न्यूनेल यांनी दिलेल्या माहितीनुसार जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्याची तयारी सुरु आहे.

X
COMMENT