आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफरीदाबाद- देशातल्या 50 पेक्षा जास्त शहरात 7 खुन आणि 600 चोऱ्या करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जगतार सिंह बद्दल नवीव खुलासा झाला आहे. क्राइम ब्रांचच्या चौकशी दरम्यान आरोपीने कबुल केले की, त्याचा तंत्र-मंत्र या गोष्टींवर विश्वास आहे, आणि तो चोरी करण्या आधी 'काली मा'चा जप करायचा. अस करायला त्याला एका तांत्रिकाने सांगितले होते. त्यानंतर तो नियमित 'काली मा'ची पुजा करायचा. फरीदाबाद पोलिसांनी सोमवारी मुजेसर एरियातुन ज्या तीन आरोपींना पकडले आहे, त्यापैकी एक जगतार गँगचा म्होरक्या आहे. त्याच्यावर आपल्या साथीदारासोबत मिळुन 7 खुन आणि 600 चोरींचा आरोप आहे.
लुटीचा विरोध केल्यानंतर लगेच सुरा भोसकायचे
जेव्हा हा लुटीला जायचा तेव्हा, अंग काठी बारीक असल्यामुळे त्याला लोक हलक्यात घ्यायचे, पण पैसे आणि दागिने नाही दिल्यावर तो लगेच सुरा भोसकायचा.
दिवसभर फुटपातवर राहायचा आणि रात्री हॉटेलमध्ये झोपायचा
आरोपी जगतार विचीत्र पद्धतीने आयुष्य जगायचा. तो रात्री दिल्लीच्या रेड लाइट एरियात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये थांबायचा पण सकाळ होताच फुटपातवर राहायचा.
42 वर्षाच्या जगतारने 2005 मध्ये केला होता पहीला खुन
पोलिसांनी सांगितले की, जुन 2005 मध्ये त्याने कुरूक्षेत्रातील एका व्यावसायिकाचा खुन केला होता, जो त्याचा पहिला अपराध होता. पोलिसांनी अनेक वेळा त्याला पकडले होते, त्यानंतर तो लुधियानाच्या सेंट्रल जेल, सिक्यॉरिटी जेल संगरूर, पटियाला, अंबाला, कुरुक्षेत्र, जींद, सोनीपत, डासना गाजियाबाद, हरदोई आणि आगऱ्या जेलमध्ये बंद होता. पोलिसांना तो फक्त एक चोरच वाटायचा पण नंतर कळाने की, त्याने 7 खुन केले होते.
देशभरात 50 शहरात केली चोरी
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने आपल्या साथीदारांसोबत मिळुन देशभरातील 50 पेक्षा जास्त शहरात चोरी आणि खुन केले आहेत. त्यात मुंबई, गोवा, सिलीगुड़ी, औरंगाबाद, नरवाना, मोहाली, चंडीगढड, रोहतक, दिल्ली, लुधियाना, सुरत, संगरूर, कुरुक्षेत्र, अंबाला, नोएडा, फरीदाबाद आणि गाजियाबाद ही प्रमुख शहरे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.