आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Man Who Made A Stringent Law Against Adultery Received The Same Offence 28 Whips

ज्याने व्याभिचाराविरोधात कठोर कायदा बनवला, त्याला याच आरोपाखाली मिळाली 28 चाबकाची शिक्षा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता : इंडोनेशियातील सुमात्रामध्ये मुखलिस बिन महंमद नावाच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी २८ वेळा चाबकाचे फटके मारण्यात आले. विवाहित महिलेशी संबंध असल्याचा मुखलिसवर आरोप आहे. इंडोनेशियात याला व्यभिचार मानले जाते. ज्या महिलेसोबत मुखलिसला पकडण्यात आले तिलाही २३ फटके मारण्यात आले. विशेष म्हणजे ज्या एकेह उलेमा काैन्सिलने हे कडक नियम बनवले आहेत त्याच्याशी मुखलिसचा संबंध आहे. मुखलिसनेच व्यभिचार करणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्यात पुढाकार घेतला होता.


एकेह प्रांत परंपरावादी मानला जातो. येथे कडक इस्लामी कायदे लागू आहेत. मुखलिस याच भागातील रहिवासी आहे. या प्रांतात जुगार खेळणे, समलैंगिक संबंध ठेवल्यास कठोर शिक्षा केली जाते. एकेहचे उपमहापौर हुसेनी वहाब यांनी सांगितले की, हे अल्लाने बनवलेले नियम आहेत. जो हे नियम तोडेल त्याला शिक्षा मिळेल. मग तो उलेमा कौन्सिलचा सदस्य असला तरी. या जोडप्याला सुमात्रा समुद्रकिनाऱ्यावर एका कारमध्ये पोलिसांनी पकडल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी शिक्षा देण्यात आली.


मुखलिसला कौन्सिलमधून हटवण्यात आले आहे. मुखलिस धर्मगुरूदेखील आहे. तो पहिलाच धर्मगुरू आहे, ज्याला देशात २००५ मध्ये शरिया कायदा लागू झाल्यानंतर सार्वजनिकरीत्या फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. प्रांतात शरिया कायदा लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्यात मुखलिसने योगदान दिले होते.
 

बातम्या आणखी आहेत...