आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनीप्लांट जमिनीवर पसरू देऊ नये, पाने पिवळी झाल्यास तोडून टाकावीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तू शास्त्रामध्ये घराची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी विविध टिप्स सांगण्यात आल्या आहेत. घरातील प्रत्येक वस्तूसाठी वास्तूमध्ये शुभ-अशुभ दिशा सांगण्यात आल्या आहेत. मान्यतेनुसार घरात मनीप्लांट लावल्याने धन आणि सुख-समृद्धी आणि सकारात्मकता वाढू शकते. परंतु चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मनीप्लांटमुळे तुम्हाला पैशाचे नुकसान होऊ शकते. कोलकाताच्या वास्तु विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार सामान्यतः मनीप्लांट घराच्या सुख-समृद्धीसाठी लावला जातो परंतु अनेकवेळा याच्या अशुभ प्रभावाने नुकसानही होऊ शकते. यामुळे मनीप्लांट लावताना येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

जमिनीवर पसरू देऊ नये : मनीप्लांटचा वेल कधीही जमिनीवर पसरू देऊ नये. मनीप्लांट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास घरात विविध प्रकारचे नुकसान होऊ शकते.

या गोष्टीकडे द्यावे : विशेष लक्ष मनीप्लांट वाळून जाणे किंवा पाने पिवळी-पांढरी होणे अशुभ मानले जाते. यामुळे दररोज मनीप्लांटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेली पाने काढून टाकावीत.

या दिशेला ठेवू नये मनीप्लांट : मनीप्लांटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य (उत्तर-पूर्व) कोपरा मानला जातो. या दिशेला मनीप्लांट लावल्यास धनवृद्धी होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

येथे मिळेल फायदा : उत्तर किंवा पूर्व-उत्तर दिशा जल तत्त्व आहे. दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशा पृथ्वी तत्त्व आहे. या दिशेला मनीप्लांट ठेवल्यास चांगले प्रभाव दिसून येतात आणि घरामध्ये धन-धान्य कमी पडत नाही.

बातम्या आणखी आहेत...