आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नाळ', 'भोंगा', 'पाणी'सह या मराठी चित्रपटांचा बोलबाला, कलाकारांनी स्वीकारला मानाचा पुरस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट - 'भोंगा' : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - शिवाजी लोटन पाटील - Divya Marathi
चित्रपट - 'भोंगा' : सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - शिवाजी लोटन पाटील

एंटरटेन्मेंट डेस्क : 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण नवी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये केले गेले आहे. या पुरस्करांचे वितरण उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते झाले. यावेळी अनेक मराठी चित्रपटांनी हा मनाचा पुरस्कार स्वीकारला. यामध्ये 'भोंगा' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, 'पाणी' चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'चुंबक' या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा अवॉर्ड मिळाला. 'नाळ' चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक तर श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार हे पुरस्कार मिळाले आहे. 
 

  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - 'भोंगा'....

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर मिळाला आहे. चित्रपटाची कथा शिवाजी लोटन पाटील आणि निशांत ढापसे यांनी लिहिली आहे. अर्जून महाजन आणि शिवाजी लोटन पाटील यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अमोल कागणे आणि दिप्ती धोत्रे या दोघांनी या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय सिनेमामध्ये कपिल कांबळे, श्रीपाद जोशी यांचाही अभिनय पहायला मिळणार आहे. रमाणी दास यांनी ‘भोंगा’चे नृत्य दिग्दर्शन केले आहे. ‘भोंगा’ सिनेमाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. ‘भोंगा’ला विजय गटेलवार यांनी संगीत दिले असून गिते सुबोध पवार यांची आहेत. ‘भोंगा’ या चित्रपटाने मे महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्रराज्य सरकारच्या ५६ व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराबरोबरच एकूण पाच पुरस्कार मिळवले होते.  - सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट  - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शिवाजी लोटन पाटील) - सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक (शिवाजी लोटन पाटील) - सर्वोत्कृष्ट पटकथा (शिवाजी लोटन पाटील) 

  • पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - 'पाणी'...

प्रियांका चोप्रा निर्मित ‘पाणी’ या चित्रपटाला पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. आदिनाथ कोठारने या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याबरोबरच यामध्ये मुख्य अभिनेत्याचीही भूमिका साकारली आहे. दिग्दर्शन करण्याची ही आदिनाथची पहिलीच वेळ आहे आणि त्याने आता यामध्ये घवघवीत यशही संपादन केले आहे.  

  • चित्रपट 'नाळ' सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक - सुधाकर रेड्डी आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे...

नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाने दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘नाळ’च्या सुधाकर रेड्डी यांनी पटकावला आहे. या चित्रपटातल्या श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे, चित्रपट - 'चुंबक'...

अक्षय कुमार प्रस्तुत ‘चुंबक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. स्वानंद यांनी या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...