आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आप्तांच्या संमतीने केलेले लग्न ही आपल्या समाजाची शक्ती!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूरमध्ये मी एका भव्य लग्नात सहभागी झालो. १२५ पाहुणे या लग्नाचे साक्षीदार ठरले. या लग्नातील वधू- वराला अरेंज्ड मॅरेजच करायचे होते. त्यांचा हा विचार पाहून मला आपल्या देशातील अरेंज्ड मॅरेजविषयी विचार करायला भाग पाडले. कारण आजचा काळ कसाही असला, तरी घरच्यांच्या पुढाकाराने झालेल्या लग्नामुळे समाजाला जोडून ठेवले आहे. लग्नाचे बंधन इतके मजबूत असते की, नवविवाहित जोडपे उच्चशिक्षित आणि विदेशी रंगात रंगलेले असूनही अरेंज्ड मॅरेजला प्राथमिकता देतात. मग त्यांच्याकडे असलेल्या पर्यायाचाही ते विचार करत नाहीत. एखादा तरुण आपल्या संस्कृतीतील प्रथेनुसार लग्न करायला होकार देतो. तथापि, त्याच्या जीवनाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. विशेष म्हणजे, त्यांना काय शिकायचे, कोणते करिअर निवडायचे, कोणत्या देशात राहायचे, याचे स्वातंत्र्य असते. अनेकदा आवडीचे पर्याय सोडायला हवेत, असे या तरुणांना कदाचित वाटत असेल. एका सर्वेक्षणानुसार, भारतात जवळपास ९० टक्के लग्न अरेंज्ड असतात. निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर अरेंज्ड मॅरेजसाठी जोडीदार निवडण्याच्या व्यवस्थेचे दोन मुख्य फायदे आहेत. पहिला म्हणजे, तरुण मुले घरातील मोठ्यांचा आदर करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आई-वडील आणि घरातील ज्येष्ठांना त्यांच्यासाठी निवडलेल्या जोडीदारांची पारख असते. दुसरा फायदा असा की, एखाद्याविषयी माहिती मिळवणे त्यांना अवघड जाते, आधीच त्यांनी शंभर चुका केलेल्या असतात. निर्णय घेण्याविषयीचे आपले पारंपरिक शहाणपण म्हणते, आपण तो घेण्यास जास्त वेळ आणि मेहनत खर्च करतो. त्यांनी दावा केलाय, की जे लोक मोठे निर्णय घेताना इतरांवर विसंबून राहतात, त्यांचा त्यांना चांगला फायदा होतो. कोणत्या कारणांमुळे आपली तरुण पिढी अरेंज्ड मॅरेजककडे आकर्षित झाली? खरं तर, लव्ह मॅरेजच्या तुलनेत अरेंज्ड मॅरेज करणाऱ्या जोडप्यांना एकमेकांविषयी जास्त माहिती नसते. त्यामुळे ते एकमेकांकडून अपेक्षा ठेवतात.समाधान मिळणाऱ्या निर्णयावरील संशोधनातून कळते की, अपेक्षा कमी असते, तेव्हा ती पूर्ण होते किंवा इच्छेपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता असते. ते नवविवाहित जोडप्यांसाठी समाधानकारक असते. या उलट लव्ह मॅरेजमध्ये डेटिंगदरम्यान एकमेकांकडून जास्त अपेक्षा केली जाते. अशा प्रकरणात संस्कृती आणि आवडी-निवडीच्या बऱ्याच गोष्टी रोमँटिक जोडीदारासाठी जड जातात. तथापि, अरेंज्ड मॅरेजमध्ये संपत्ती आणि नातेसंबंधावर जास्त लक्ष दिले जाते. मी जेव्हा अमेरिकेत चीनच्या एका मित्रासोबत लग्नाचे फोटो पाहत होतो, तेव्हा त्याने एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, भारतासारख्या देशात संमतीने विवाह कसे ठरविले जातात? त्याचा प्रश्न योग्य होता. कारण अमेरिकी लोक वैयक्तिक निवडीवर विश्वास ठेवतात. त्याचे उत्तर देताना.. आमची चर्चा भारताच्या अनेक सोशल साइटवर झाली, ज्या कौटुंबिक संबंधाच्या व्यतिरिक्त असे लग्न लावून देण्यात मदत करतात. माझे उत्तर ऐकून ते म्हणाले, भारतात फक्त २०० डॉलरमध्ये जोडीदार मिळतो का? इतर देशातही अशी सुविधा असायला हवी? फंडा असा  आप्तांच्या पसंतीने झालेले लग्न संस्कृती टिकवण्यास उपयुक्त ठरते आणि सामाजिक बांधिलकी कायम राहते, असे तरुणांना वाटू लागले आहे. मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर मॅनेजमेंट फंडा, एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू, raghu@dbcorp.in  

बातम्या आणखी आहेत...