आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: महिलेवर चार जणांचा सामूहिक अत्याचार,आरोपी ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- तालुक्यात आपल्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दिली. पाेलिसांनी बुधवारी सायंकाळी चारही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी अपर पाेलिस अधीक्षक समाधान पवार यांनी सूत्रे हाती घेतली अाहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

 

पीडितेच्या तक्रारीनुसार, शेतात येऊन आपल्यावर चार जणांनी अमानुषपणे अत्याचार केले. या प्रकरणात तीन दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल केला हाेता. पाेलिस तपासात काही गंभीर बाबी समाेर अाल्यानंतर पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांनी लक्ष घातले.  तपास सुरू असल्याने तूर्तास अधिक माहिती देता येणार नसल्याचे पाेलिस निरीक्षक साईनाथ ठाेंबरे यांनी स्पष्ट केले. गावात राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याने तक्रारीत कितपत सत्यता आहे, याबाबत पोलिसांना सांशकता आहे. 

बातम्या आणखी आहेत...