आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किड्याप्रमाणे 100 मीटर उंच उडू शकताे 10 ग्रॅमचा रोबोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस  - फ्रान्सचे एरोनॉटिकल इंजिनिअर अॅडविन वॅन रुबेंबे यांनी किड्याप्रमाणे दिसणारा “मेटाफ्लाय’ नावाचा रोबोट तयार केला आहे. लहानशा किड्यांवर संशोधन करण्यासाठी या रोबोटीची निर्मिती करण्यात आली आहे. १० ग्रॅम वजनाचा रोबोट १०० मीटर उंच उडू शकतो. 


“बायोमिमॅटिक्स’ अशा खास सिंथॅटिक प्रक्रियेमुळे त्याला हवेत उडता येते. त्यामुळे तो हुबेहूब नैसर्गिक किड्याप्रमाणेच दिसतो. याची लांबी फक्त ७.५ इंच आहे. त्याने पंख पसरले तर ११.४ इंच रुंद होतो. याची वेगाची मर्यादा ताशी १८ किमी इतकी आहे. याला दोन चॅनल्स रिमोटने नियंत्रित करता येते. याचे पंख कार्बन फायबर, लिक्विड क्रिस्टल पाॅलिमर व ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलिनपासून तयार करण्यात आले आहेत. त्याचे पुढील पाय व मागचे बंपर याच्या बॉडीला सुरक्षित ठेवतात. 


याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त १२ मिनिटांचा कालावधी लागतो. एकदा चार्ज केल्यानंतर तो ८ मिनिटे उडू शकतो. याच्या खास पॉवर बँकमध्ये याला २० वेळा पूर्णपणे चार्ज करण्याची क्षमता असते.

बातम्या आणखी आहेत...