आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएचटी-सीईटी परीक्षा 13 ते 23 एप्रिलदरम्यान हाेणार; पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जळगाव : इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, कृषीसह विविध १४ प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य अाहेत. महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले. येत्या १३ ते २३ एप्रिलदरम्यान एमएचटी सीईटी परीक्षा पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करण्यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या आठ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या सहा अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी एमएचटी-सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिलदरम्यान होणार आहे. एमबीएची सीईटी परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी होणार आहे. एलएलबी तृतीय वर्षाची सीईटी २८ जून आणि एलएलबी पाच वर्ष १२ एप्रिल रोजी होणार आहे. राज्य प्रवेश परीक्षा कक्षाची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमवेत नुकतीच बैठक पार पडली. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रक व माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियाेजन करणे साेपे हाेणार अाहे.

संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर माहिती उपलब्ध

यंदाही सर्व परीक्षांचे निकाल हे पर्सेन्टाइल पद्धतीने घोषित करण्यात येणार आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिलदरम्यान होणार आहे. एमबीएची सीईटी परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी होईल. तर www.mahacet.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध असेल. पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या दरम्यान होतील.

अशा होणार १४ प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी परीक्षा

एमएचटी सीईटी - १३ ते २३ एप्रिल २०२०, एमबीए / एमएमएस - १४ आणि १५ मार्च २०२०, एमसीए - २८ मार्च २०२०, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - १६ मे २०२०, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - १० मे २०२०, एलएलबी ५ वर्षे - १२ एप्रिल २०२०, एलएलबी ३ वर्षे - २८ जून २०२०, बीपीएड - ११ मे २०२०, बीएड / एमएड - १२ मे २०२०, एमपीएड - १४ मे २०२०, बीए / बीएससी बीएड - २० मे २०२०, एमएड - २६ मे २०२०.
 

बातम्या आणखी आहेत...