आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - जास्त भेटाभेटीची आवड असणे वैताग आणू शकते. याचाच प्रत्यय सध्या मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना येत आहे. डेहराडूनहून दिल्लीचे अंतर फक्त २५० किमी असल्याने त्यांना भेटण्यासाठी दररोज शंभर ते दीडशे लोक येत आहेत. लोकांशी भेटण्याची आवड असल्याने ते कधी कोणाला नाही म्हणत नाहीत, मात्र यामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येत आहे. यापासून वाचण्यासाठी त्यांनी शास्त्री भवनमध्ये आपल्या कार्यालयाबाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. हा सुरक्षा रक्षक आत जाणाऱ्या लोकांची पूर्ण माहिती घेतो आणि मंत्र्यांशी भेटण्यास योग्य असेल तरच त्यांना आत सोडतो. ज्या व्यक्तीकडे अन्य अधिकाऱ्यांच्या नावाचा पास असतो त्यांना बाहेरच थांबवतो. सरकारी सुरक्षा रक्षकाकडे फक्त इमारतीच्या आत सोडण्याची जबाबदारी असते, घरामध्ये सोडण्याची नव्हे. त्यामुळे खासगी सुरक्षा रक्षकाची ड्यूटी घरासमोर लावली आहे. हा खासगी सुरक्षा रक्षक अटकळ लावून मंत्र्यांच्या भेटीस उत्सुक असणाऱ्यांना बाहेरच थोपवतो. दिल्लीपासून डेहराडूनचे अंतर चार तासांचे असल्याने मंत्री गमतीने आपल्या समर्थकाला म्हणतात, तुम्ही दिल्लीत या चहा घेण्यासाठी. मग लोक सायंकाळपर्यंत दिल्लीत पोहोचतात. काही जण तर मंत्री माझे शाळामित्र आहेत, असे सांगून पास तयार करायलाही सांगतात.
ओएसडी म्हणाले : सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून सुरक्षा रक्षक नेमला
मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांचे ओएसडी अजय बिष्ट यांनी सांगितले की, अनेक जण शास्त्री भवनमधील अन्य अधिकारी किंवा ब्लॉकचा पास घेतात आणि मंत्र्यांशी भेटण्यास येतात. त्याचा कामावर परिणाम होतो. सुरक्षिततेचा विचार करून खासगी सुरक्षा रक्षक नेमला आहे. शास्त्री भवनची सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफकडे असते. तेथे विशेष ओळखपत्रावर लोकांना प्रवेश दिला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.