आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता एचडीएफसीच्या अधिकाऱ्याची रक्ताने माखलेली कार सापडली, अपहरण झाल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची रक्ताने माखलेली कार शनिवारी मुंबईत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून संघवी बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संघवी हे कमला मिल परिसरातील एचडीएफसी बँकेत कार्यरत होते.

 

सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरून मलबार हिलला घरी निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना सुरक्षा रक्षकाने त्यांना पाहिले होते. मात्र, ते घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

 

अपहरण झाल्याचा संशय : सिद्धार्थ संघवी यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात आढळली. ही कार रक्ताने माखलेली आहे. त्यामुळे त्यांचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...